Arjun Tendulkar Instagram Story, IPL 2025: टीम इंडियाचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने जागतिक क्रिकेट गाजवले. त्याचा मुलगा अर्जुन तेडुलकर वडीलांकडून प्रेरणा घेऊन क्रिकेटर बनला. देशांतर्गत क्रिकेट सामन्यात तो आपली चमक दाखवत असतो. IPL मध्येही त्याला Mumbai Indians संघाने विकत घेतले आहे. गेल्या २-३ वर्षांपासून अर्जुन हा मुंबई इंडियन्सचा भाग आहे. पण त्याला अपेक्षित संधी मिळाली नाही. यंदाच्या हंगामात मुंबईने विघ्नेश पुथूर, अश्वनी कुमार यांसारख्या नवख्या खेळाडूंना संधी दिली. पण अर्जुन अद्यापही बाकावरच बसला आहे. त्याला संधी कधी मिळणार, याबाबत सतत विचारणा होत असते. याचदरम्यान अर्जुनची एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.
अर्जुन तेंडुलकरने जपली माणुसकी
आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकातही अर्जुन तेंडुलकर एक चांगले काम करताना दिसला. आई गमावलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे. अर्जुन तेंडुलकरने इन्स्टा स्टोरीमध्ये कुत्र्याशी संबंधित सर्व माहिती शेअर केली आहे आणि लोकांना आवाहन केले आहे की या पिल्लाला दत्तक घेऊन हक्काचे घर द्यावे. अर्जुनने त्या पिल्लाला फोटो पोस्ट केला आहे. त्याचे नाव भोलू असून तो फक्त ४५ दिवसांचा आहे. आणि तो एक मेल डॉग (पुल्लिंगी) आहे. अर्जुनने दिलेल्या माहितीनुसार, भोलूची ब्रीड इंडी आहे आणि सध्या हे पिल्लू ग्रँट रोड येथे आहे.
![]()
भोलूला दत्तक घेण्यासाठी कुणाशी संपर्क साधता येईल, याबाबतही त्याने माहिती दिली आहे. अर्जुनने लिहिले आहे की, भोलू हा एक स्ट्रीट डॉग आहे. त्याच्या आईचे निधन झाले आहे आणि ज्या कुटुंबाने त्याला वाचवले आहे त्यांना पाळीव प्राणी सांभाळण्याचा अनुभव नाही. त्यामुळेच अर्जुनने हे अपील केले आहे.
Web Title: IPL 2025 Arjun Tendulkar Instagram story grabs attention when Mumbai Indians not given a chance to play in Playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.