IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरनं विचारलं क्वारंटाईनचा वेळ कसा घालवू?; रोहित शर्मानं दिलेलं भन्नाट उत्तर व्हायरल

IPL 2021 BCCIच्या नियमानुसार तो आता ७ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. क्वारंटाईन कालावधीत वेळ कसा घालवू, असा प्रश्न त्यानं सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून विचारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 01:00 PM2021-04-03T13:00:00+5:302021-04-03T13:00:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Rohit Sharma trolls 'TikTok star' David Warner for seeking ideas to kill boredom in quarantine | IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरनं विचारलं क्वारंटाईनचा वेळ कसा घालवू?; रोहित शर्मानं दिलेलं भन्नाट उत्तर व्हायरल

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरनं विचारलं क्वारंटाईनचा वेळ कसा घालवू?; रोहित शर्मानं दिलेलं भन्नाट उत्तर व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( Sunrisers Hyderabad skipper David Warner ) भारतात दाखल झाला आहे. BCCIच्या नियमानुसार तो आता ७ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. क्वारंटाईन कालावधीत वेळ कसा घालवू, असा प्रश्न त्यानं सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून विचारला आहे. त्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यानं भन्नाट उत्तर दिले आहे. रिषभ पंत अन् उर्वशी रौतेला यांची पुन्हा चर्चा; अभिनेत्रीच्या उत्तरानं सारेच हैराण, जाणून घ्या नेमकं प्रकरण

भारत-इंग्लंड मालिकेतील खेळाडू त्यांच्या त्यांच्या आयपीएल फ्रँचायझींमध्ये थेट जाऊ शकतात. पण, अन्य खेळाडूंना ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावाच लागेल. वॉर्नरला हा क्वारंटाईन कालावधी कंटाळवाणा वाटत आहे आणि काय करू असा प्रश्न त्याला पडला आहे. ''मी भारतात दाखल झालो आहे आणि आयपीएलसाठी सज्ज आहे, पण या क्वारंटाईन कालावधीत काय करू, याबाबत मला काही आयडिया द्या!, तुमच्या आयडिया कमेंट करा,''असे त्यानं व्हिडीओ पोस्ट करून लिहिले.  सचिन तेंडुलकरच्या प्रकृतीबाबत आली मोठी बातमी, बालपणीच्या मित्रानं दिली महत्त्वाची माहिती


मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंही त्याच्या या पोस्टला रिप्लाय दिला. रोहित म्हणाला, तू कदाचित TikTok ला मिस करत असशील.'' भारताता टिकटॉकवर बंदी आहे आणि कोरोना काळात वॉर्नरने अनेक टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते आणि त्यांना तुफान प्रतिसादही मिळाला होता.   IPL 2021पूर्वी भारतीय फलंदाजानं चोपल्या २९ चेंडूंत १४४ धावा, पुण्याच्या खेळाडूची १४ चौकार व १५ षटकारांची आतषबाजी

सनरायझर्स हैदराबादचा संघ ( SRH squad) - डेव्हिड वॉर्नर, अभिषेक शर्मा, बसील थम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन, मनिष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धीमान सहा, अब्दुल समद, जेसन रॉय, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंग, केदार जाधव, मुजीब उर रहमान, जे सुचिथ  

IPL 2021 Rules: Do’s: काय करावं...

  • सात दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन - आयपीएल बायो-बबलमध्ये दाखल होताच सात दिवसांच्या क्वारंटाईन कालावधी खेळाडूंना पूर्ण करावा लागेल. हाच नियम खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही लागू असेल.  
  • या स्पर्धेत बबल-टू-बबल असे ट्रान्स्फर असणार आहे. (  bubble-to-bubble transfers). याचा अर्ध एखादा खेळाडू किंवा कोचिंग स्टाफचा सदस्य आंतरराष्ट्रीय मॅचमधूल आल्यास तो आयपीएल बायो-बबलमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण न करताच दाखल होऊ शकतो. पण, ते खेळाडू किंवा स्टाफ चार्टर्ड विमान किंवा प्रायव्हेट कारनं येत असेल तरच त्याला आयपीएल बायो-बबलमध्ये येता येईल. रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!
  • बीसीसीआयच्या आदेशानुसार आयपीएलमधील प्रत्येक संघाचा डाव ९० मिनिटांच्या आत संपायला हवा. याआधी प्रत्येक डावाचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला सुरु व्हायला हवं, असा नियम होता. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार सामन्याचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला संपायला हवं. 
  • बबल बाहेरील खेळाडूशी संपर्क आल्यास मैदानावरील खेळाडूनं त्वरित जर्सी बदलावी.  खेळाडूंची चूक कॅप्टनला महागात पडणार; तर विराट कोहली, रोहित शर्मा, MS Dhoni यांच्यावर थेट बंदीची कारवाई होणार!
  • चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास त्याला सॅनिटाईझ करावे
  •  

Web Title: IPL 2021: Rohit Sharma trolls 'TikTok star' David Warner for seeking ideas to kill boredom in quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.