IPL 2021पूर्वी भारतीय फलंदाजानं चोपल्या २९ चेंडूंत १४४ धावा, पुण्याच्या खेळाडूची १४ चौकार व १५ षटकारांची आतषबाजी

दुबईत सुरू असलेल्या A20 लीगमध्ये गुरुवारी चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. ख्रिस गेलचा विक्रम थोडक्यात वाचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 11:27 AM2021-04-03T11:27:49+5:302021-04-03T11:28:32+5:30

whatsapp join usJoin us
Ameya Soman smashed 167 runs in 61 balls for Rajkot Thunders in A20 League | IPL 2021पूर्वी भारतीय फलंदाजानं चोपल्या २९ चेंडूंत १४४ धावा, पुण्याच्या खेळाडूची १४ चौकार व १५ षटकारांची आतषबाजी

IPL 2021पूर्वी भारतीय फलंदाजानं चोपल्या २९ चेंडूंत १४४ धावा, पुण्याच्या खेळाडूची १४ चौकार व १५ षटकारांची आतषबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबईत सुरू असलेल्या A20 लीगमध्ये गुरुवारी चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. राजकोट थंडर्स ( Rajkot Thunders) संघाचा फलंदाज अमय सोमन ( Ameya Soman) यानं वादळी खेळी केली. त्यानं ६१ चेंडूंत १६७ धावां चोपल्या. त्याच्या या खेळीत १५ चौकार व १४ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर राजकोट थंडर्स संघानं २० षटकांत कारा डायमंड्स ( Cara Diamonds) संघाविरुद्ध ३ बाद २६१ धावांचा डोंगर उभा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना डायमंड्सचा डाव १५.४ षटकांत १०३ धावांवर गडगडला. राजकोट थंडर्स संघानं हा सामना १५८ धावांची जिंकला. डायमंड्स संघातील ९ खेळाडू ३३ धावांत माघारी परतले.  बाबर आझमनं मोडला विराट कोहलीचा विक्रम; रमीझ राजा म्हणतात, म्हणून पाकिस्तान संघाला जगभरात डिमांड!

राजकोट थंडर्सचा अमय सोमन हा या सामन्याचा नायक ठरला. त्यानं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले. पुण्यातील या खेळाडूनं १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यात ८ चौकार व ३ षटकार खेचले. त्याच्या या फटकेबाजीनं थंडर्स संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये ७४ धावांचा डोंगर उभा करून दिला. त्याची ही फटकेबाजी अशीच सुरू राहिली आणि पहिल्या १० षटकांत थंडर्सनं १२७ धावा केल्या. त्यात अमयच्या ८३ धावांचे योगदान होते.  IPL मधील फलंदाजांचे १० मोठे विक्रम; ५ हजार धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांत ४ भारतीय, ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक पराक्रम

पुढील १० षटकांत अमयनं चौकारापेक्षा अधिक षटकार खेचले. त्यानं ३७ चेंडूंत शतक पूर्ण केलं. त्यानं फक्त चौकार व षटकारांनी १४४ धावा कुटल्या. त्यानं २३ धावा या एकेरी व दुहेरी धावेनं केल्या. थोडक्यात ख्रिस गेलचा नाबाद १७५ धावांचा विक्रम वाचला. ख्रिस गेलनं २०१३मध्ये पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध ६६ चेंडूंत नाबाद १७५ धावा केल्या होत्या. त्यात १३ चौकार व १७ षटकारांचा समावेश होता. IPL 2021 : Big News : KKRच्या नितीश राणानंतर 'वानखेडे'वरील आता ८ जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह

Web Title: Ameya Soman smashed 167 runs in 61 balls for Rajkot Thunders in A20 League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.