IPL मधील फलंदाजांचे १० मोठे विक्रम; ५ हजार धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांत ४ भारतीय, ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक पराक्रम

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे आणि ३० मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत फक्त पाचच फलंदाजांना पाच हजारापेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत आणि त्यात विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा व शिखर धवन या चार भारतीयांचा समावेश आहे. डेव्हीड वॉर्नर हा एकमेव परदेशी फलंदाज या लिस्टमध्ये आहे.

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज - विराट कोहली - ५८७८ धावा, सुरेश रैना - ५३६८ धावा, डेव्हिड वॉर्नर - ५२५४ धावा, रोहित शर्मा - ५२३० धावा, शिखर धवन - ५१९७ धावा.

सर्वाधिक षटकार - ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक ३४९ षटकारांचा विक्रम आहे. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( २३५), महेंद्रसिंग धोनी ( २१६), रोहित शर्मा ( २१३), विराट कोहली ( २०१) यांचा क्रमांक येतो.

सर्वाधिक चौकार - दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनच्या नावावर सर्वाधिक ५९१ चौकारांचा विक्रम आहे. त्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नर ( ५१०), विराट कोहली ( ५०३), सुरेश रैना ( ४९३) व गौतम गंभीर ( ४९१) यांचा क्रमांक येतो.

जलद शतक - आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं ३० चेंडूंत हे शतक पूर्ण करताना पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध १७ षटकार व १३ चौकार ठोकून १७५ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर युसूफ पठाण ( ३७ चेंडू), डेव्हिड मिलर ( ३८ चेंडू), अॅडम गिलख्रिस्ट ( ४२ चेंडू) व एबी डिव्हिलियर्स ( ४३ चेंडू) यांचा क्रमांक येतो.

७ वर्ष झालं ख्रिस गेलचा विक्रम अबाधित - आयपीएलमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं २०१३मध्ये पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध नाबाद १७५ धावांची वादळी खेळी केली होती. आयपीएल इतिहासातिल ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्यानंतर ब्रेंडन मॅक्यूलम ( १५८* वि. RCB, २००८), एबी डिव्हिलियर्स ( १३३* वि. MI, २०१५), लोकेश राहुल ( १३२* वि. RCB, २०२०) आणि एबी डिव्हिलियर्स ( १२९* वि. GL, २०१६) यांचा क्रमांक येतो.

आयपीएलमध्ये ५०हून अधिकवेळा ५०+ धावा करणारा डेव्हिड वॉर्नर हा एकमेव खेळाडू आहे. त्याच्या नावावर ४ शतकं व ४८ अर्धशतकं आहेत. त्यानंतर शिखर धवन ( २ शतकं व ४१ अर्धशतकं), विराट कोहली ( ५ शतकं व ३९ अर्धशतकं), रोहित शर्मा ( १ शतक व ३९ अर्धशतकं) आणि सुरेश रैना ( १ शतक व ३८ अर्धशतकं) यांचा नंबर लागतो.

एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं २०१३मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध १७ षटकार खेचले होते. या विक्रमात टॉप टेनमध्ये फक्त एकच भारतीय फलंदाज आहे. ब्रेंडन मॅक्यूलम ( १३ वि. RCB), ख्रिस गेल ( १३ वि. DC), एबी डिव्हिलियर्स ( १२ वि. GL), ख्रिस गेल ( १२ वि. PBKS), आंद्रे रसेल ( ११ वि. CSK), सनथ जयसूर्या ( ११ वि. CSK), मुरली विजय ( ११ वि. RR), ख्रिस गेल ( ११ वि. SRH) आणि किरॉन पोलार्ड ( १० वि. PBKS) हे टॉप टेन फलंदाज आहेत.

एका डावात सर्वाधिक स्ट्राईक रेटचा विक्रम कृणाल पांड्याच्या नावावर आहे. त्यानं ४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ५०० च्या स्ट्राईक रेटनं २० धावा चोपल्या.

रोहित शर्मासह चार खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक १३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. रोहित शर्मा, हरभजन सिंग, पार्थिव पटेल व अजिंक्य रहाणे यांच्या नावावर हा नकोसा विक्रम आहे.

सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम लोकेश राहुलच्या नावावर आहे. त्यानं १४ चेंडूंत ४ षटकार व ६ चौकारांच्या मदतीनं ५१ धावा चोपल्या. त्यानंतर युसूफ पठाण ( १५ चेंडू ) , सुनील नरीन ( १५ चेंडू), सुरेश रैना ( १६ चेंडू ) आणि ख्रिस गेल ( १७ चेंडू) यांचा क्रमांक येतो.