IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Tom Moody confirms T Natarajan isn't dropped, but rested to maintain his workload | IPL 2021, MI vs SRH T20 Live : फॉर्मात असलेल्या टी नटराजनला का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स 

IPL 2021, MI vs SRH T20 Live : फॉर्मात असलेल्या टी नटराजनला का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स 

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. रोहित व सूर्यकुमार यादव यांना विजय शंकरनं माघारी पाठवल्यानंतर SRHनं सामन्यात पुनरागमन केलं. या सामन्यात SRHनं चार बदल केले आणि त्यासाठी त्यांनी फॉर्मात असलेल्या टी नटराजनला ( T Natarajan) बाकावर बसवल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामागचं महत्त्वाचं कारण समोर आलं. IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update

  • मुंबई इंडियन्स अंतिम ११ खेळाडू ( Mumbai Indians playing XI) - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह   MI vs SRH, MI vs SRH live score
  • सनरायझर्स हैदाराबादचे ११ खेळाडू ( Sunrisers Hyderabad's playing XI) - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विराट सिंग, अब्दुल समद, विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, मुजीब उर रहमान, खलील अहमद  IPL 2021, IPL 2021 latest news

 

टी नटराजनला वगळण्यात आलेलं नाही. या स्पर्धेचा कालावधी पाहता त्याच्यावरील भार कमी करण्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे, असे SRHचे टीम डायरेक्टर टॉम मूडी यांनी सांगितले.   रोहित शर्मा सुसाट, सामन्याच्या चौथ्याच षटकात नोंदवला भारी विक्रम IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update
 
विजय शंकरनं सामना फिरवला 
विजय शंकरनं त्याच्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. शंकरच्या गोलंदाजीवर पुल फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित ( ३२) माघारी परतला, विराट सिंहनं त्याची कॅच घेतली. रोहितच्या खेळीत २ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवनं एक चौकार व एक षटकार खेचून MIच्या धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात दिसला, परंतु विजय शंकरनं स्लोव्हर चेंडू टाकून त्याला कट अॅन बोल्ड होण्यास भाग पाडले. सूर्या १० धावांवर विजयच्या गोलंदाजीवर त्याच्याच करवी झेलबाद झाला. दोन महत्त्वाच्या विकेट्स पडल्यानंतर मुंबईची धावगती मंदावली. आदिल राशिदच्या फिरकीचा सामना करताना MIचे फलंदाज चाचपडत होते.  IPL 2021 MI vs SRH Live T20 Score

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Tom Moody confirms T Natarajan isn't dropped, but rested to maintain his workload

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.