IPL 2021, MI vs SRH T20 Live : रोहित शर्मा सुसाट, सामन्याच्या चौथ्याच षटकात नोंदवला भारी विक्रम

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 07:54 PM2021-04-17T19:54:26+5:302021-04-17T20:00:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Rohit Sharma has most number of sixes by an Indian in IPL history | IPL 2021, MI vs SRH T20 Live : रोहित शर्मा सुसाट, सामन्याच्या चौथ्याच षटकात नोंदवला भारी विक्रम

IPL 2021, MI vs SRH T20 Live : रोहित शर्मा सुसाट, सामन्याच्या चौथ्याच षटकात नोंदवला भारी विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली. चार बदल करून मैदानावर उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांचा त्यांनी धैर्यानं सामना केला. रोहितनं चौथ्या षटकातच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.  IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेपॉकवर दोन सामने खेळल्यामुळे येथील खेळपट्टीचा चांगला अभ्यास आहे. मुंबई इंडियन्सनं आजच्या सामन्यात एक बदल केला असून अॅडम मिल्नेला अंतिम ११मध्ये संधी दिली आहे. आयपीएल लिलिवात मिल्नेसाठी MIनं ३.२ कोटी मोजले होते आणि तो आज पदार्पण करणार आहे. सनरायझर्सनं चार बदल केले आहेत. ipl 2021 t20 MI vs SRH live match score updates chennai

  • मुंबई इंडियन्स अंतिम ११ खेळाडू ( Mumbai Indians playing XI) - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह   MI vs SRH, MI vs SRH live score
  • सनरायझर्स हैदाराबादचे ११ खेळाडू ( Sunrisers Hyderabad's playing XI) - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विराट सिंग, अब्दुल समद, विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, मुजीब उर रहमान, खलील अहमद  IPL 2021, IPL 2021 latest news

 

रोहित शर्माचा विक्रम...
पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकनं दोन सुरेख चौकार मारून MIला सकारात्मक सुरुवात करून दिली. आयपीएल २०२१त पहिलाच सामना खेळणाऱ्या खलील अहमद गोलंदाजीवर घाई करून फटके मारण्याचा मोह रोहित-डी कॉकनं टाळला. पण, मुजीब उर रहमानच्या पहिल्याच षटकात १३ धावा कुटल्या. रोहितनं तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमध्ये सर्वाधिक २१६ षटकार मारण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी रोहितनं बरोबरी केली. ( Most sixes by an Indian in IPL). पुढच्याच षटकात भुवीच्या गोलंदाजीवर रोहितनं पुल शॉट मारून आणखी एक चेंडू सीमापार पाठवत, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये ४००० धावांचा पल्लाही पार केला. MI vs SRH Live Score, IPL 2021 MI vs SRH, MI vs SRH Live Match

सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

  1. ख्रिस गेल - ३५१
  2. एबी डिव्हिलियर्स - २३७
  3. रोहित शर्मा - २१७
  4. महेंद्रसिंग धोनी - २१६
  5. विराट कोहली - २०१ 

Web Title: IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Rohit Sharma has most number of sixes by an Indian in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.