IPL 2021 : 'As long as they have 'Brahmastra', they are 'Ajay': Sehwag all praise for Jasprit Bumrah after MI beat SRH | IPL 2021 : वीरेंद्र सेहवागनं MI गोलंदाज जसप्रीत बुमराहला दिलं नवं नाव; SRHविरुद्धच्या कामगिरीवरून झाला खूश!

IPL 2021 : वीरेंद्र सेहवागनं MI गोलंदाज जसप्रीत बुमराहला दिलं नवं नाव; SRHविरुद्धच्या कामगिरीवरून झाला खूश!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( MI) शनिवारी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघावर रोमहर्षक विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या ५ बाद १५० धावांचा पाठलाग करणारा डेव्हिड वॉर्नरचा SRH संघ १३७ धावांत तंबूत परतला. पुन्हा एकदा हैदराबादच्या मधल्या फळीनं शरणागती पत्करली आणि विजयाच्या उंबरठ्यावरून पुन्हा एकदा SRH ला माघारी फिरावे लागले. आपलं भविष्य वाचवण्यासाठी रोहित शर्माचा पुढाकार; क्रिकेटच्या मैदानावरून करतोय मोठं समाजकार्य!

कर्णधार रोहित शर्मा व किरॉन पोलार्ड ( नाबाद ३५) यांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं ५ बाद १५० धावा केल्या. SRHचे सलावीर वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी ६७ धावांची भागीदारी करून चांगली सुरूवात केली. पण, त्यानंतर त्यांचा संघ १३७ धावांत माघारी परतला व मुंबईनं १३ धावांनी हा सामना जिंकला. ट्रेंट बोल्टनं २८ धावांत ३, राहुल चहरनं १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. जसप्रीतनं १४ धावा देत १ विकेट घेतली. हार्दिक पांड्यानं दोन अप्रतिम धावबाद केले आणि सामना तिथेच फिरला. मुंबई इंडियन्सच्या या कामगिरीनंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानं जसप्रीत बुमराहला नवं नाव दिलं. वरुण चक्रवर्थीनं RCBचा कर्णधार विराट कोहलीला 'मामू' बनवलं, राहुल त्रिपाठीनं अफलातून झेल टिपला, Video 

अखेरच्या चार षटकांत ३१ धावांची गरज अन् MIच्या गोलंदाजांची कामगिरी
१७ वे षटक- जसप्रीत बुमराह ( ४ धावा)
१८ वे षटक- ट्रेंट बोल्ट ( ६ धावा व २ विकेट्स)
१९ वे षटक - जसप्रीत बुमराह ( ५ धावा  व १ विकेट्स)
२०वे षटक - जसप्रीत बुमराह ( २ धावा व २ विकेट्स) 

''जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्ससाठी 'ब्रम्हास्त्र' आहेत, जोपर्यंत हा ब्रम्हास्त्र त्यांच्याकडे आहे, ते अजय राहतील,''असे सेहवागनं क्रिकबजशी बोलताना म्हटले.   

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 : 'As long as they have 'Brahmastra', they are 'Ajay': Sehwag all praise for Jasprit Bumrah after MI beat SRH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.