IPL 2021, RCB vs KKR T20 Live : Brilliant running outfield catch by Rahul Tripathi. Goodbye Virat Kohli for 5, Video | IPL 2021, RCB vs KKR T20 Live : वरुण चक्रवर्थीनं RCBचा कर्णधार विराट कोहलीला 'मामू' बनवलं, राहुल त्रिपाठीनं अफलातून झेल टिपला, Video 

IPL 2021, RCB vs KKR T20 Live : वरुण चक्रवर्थीनं RCBचा कर्णधार विराट कोहलीला 'मामू' बनवलं, राहुल त्रिपाठीनं अफलातून झेल टिपला, Video 

IPL 2021, RCB vs KKR T20 Live Score Update : आयपीएलच्या १४व्या पर्वातील पहिल्या डबल हेडर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB ) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) एकमेकांना भिडत आहेत. कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानं आजच्या अंतिम ११मध्ये फक्त ३ परदेशी खेळाडूंना संधी देताना भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवला, परंतु विराटलाच अपयश आल्याचे पाहायला मिळाले. KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं त्याच्या रणनीतीत काहीच बदल न करता फिरकीपटूंकडून गोलंदाजीला सुरुवात केली.  त्याचा फायदा त्याला दुसऱ्याच षटकात झाला. IPL 2021, RCB vs KKR T20 Live Score Update

टीम इंडियाच्या दारावरून दोनवेळा फिटनेसच्या कारणावरून माघारी परतावे लागलेल्या वरुण चक्रवर्थीनं दुसऱ्या षटकात RCBला दोन मोठे धक्के दिले. त्यानं दुसऱ्या चेंडूवर गुगली फेकून विराटला मामू बनवले. चक्रवर्थीच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा विराटचा प्रयत्न फसला अन् चेंडू हवेत उंचावला. राहुल त्रिपाठीनं उलट्या दिशेनं धाव घेताना अप्रतिम झेल टिपून विराटला ५ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. त्याच षटकात अखेरच्या चेंडूवर चक्रवर्थीनं रजत पाटिदारचा त्रिफळा उडवला. RCB vs KKR, RCB vs KKR live score, IPL 2021

पाहा विकेट्सरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (royal challengers bangalore)
विराट कोहली (कर्णधार) Virat Kohli (c), देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed), एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers (wk), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), रजत पाटिदार (Rajat Patidar), काइल जेमिन्सन (Kyle Jamieson), हर्षल पटेल (Harshal Patel), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

कोलकाता नाइट रायडर्स (kolkata knight riders)
शुभमन गिल (Shubman Gill), नितीश राणा (Nitish Rana), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi), दिनेश कार्तिक Dinesh Karthik (wk), इऑन मार्गन (कर्णधार)  Eoin Morgan (c), आंद्रे रसेल (Andre Russell), शाकिब अल हसन, पॅट कमिन्स (Pat Cummins), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, RCB vs KKR T20 Live : Brilliant running outfield catch by Rahul Tripathi. Goodbye Virat Kohli for 5, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.