देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, लॉकडाऊनचं पुन्हा सावट अशात पुन्हा नकारात्मकतेच्या गर्दीत अडकणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इंडियन प्रीमिअर लीगमुळे ( IPL 2021) हास्य उमटत आहे.  कोरोना व्हायरसमुळे गतवर्षी आयपीएल यूएईत खेळवण्यात आली, परंतु यंदा ती देशातच खेळवण्याचं शीवधनुष्य BCCIनं उचललं आहे. आतापर्यंत आयपीएलच्या १४व्या पर्वातील ९ सामने झाले आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) शनिवारी आणखी एका रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ( Sunrisers Hyderabad) पराभव केला. MIच्या प्रत्येक सामन्यात एक खास गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि ती म्हणजे कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याची बूटं... प्रत्येक सामन्यात रोहित त्याच्या बुटांवरून कोणता तरी सामाजिक संदेश देत आहे. 

रोहित शर्मा मागील काही वर्षांपासून वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेच्युर ( World Wide Fund for Nature ) यांच्यासोबत काम करत आहे. रोहित वारंवार  पर्यावरणाच्या मुद्यावर जनजागृती करतो. यावेळी रोहितनं आयपीएलच्या व्यासपीठावरून ही जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. तो त्याच्या बुटांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत आहेत. आयपीएलच्या १४व्या पर्वात मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत तीन सामने झाले आहेत आणि या तीनही सामन्यांत रोहितच्या बुटांवर वेगवेगळा संदेश दिसला. 

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर रोहितनं इंस्टाग्रावर एक पोस्ट लिहिली. त्यानं लिहिलं की,''समुद्रकिनाऱ्यावर दिसणारे खडकं ही समुद्राची हृदय आणि आत्मा आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण होत असताना पाहून मला आनंद होतो. समुद्राप्रती माझ्या मनात असलेलं प्रेम हे शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि त्याचे रक्षण करण्यासाठी मी नेहमी झटत राहिन. सुरूवातीला मलाही समुद्राची भीती वाटली, परंतु मी हळुहळू आपल्या समुद्र जीवनाबद्दल जाणून घेतलं, शिकलो आणि आपल्या जगण्यासाठी ते किती महत्त्वाचे आहे, याची जाण मला झाली. त्यानंतर मी समुद्र जीवनाच्या प्रेमातच पडलो.''

''आपल्या दैनंदीन जीवनातीत एका बदलाचा आपल्या पर्यावरणावर परिणाम करू शकतो आणि ते आपण सर्वांनी जाणू घ्यायला हवं. समुद्राचे रक्षण, म्हणजे आपल्या भविष्याचे रक्षण,''असेही रोहित म्हणाला.  

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध रोहितच्या बूटांवर एकशिंगी गेंड्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यातून त्यानं या नष्ट होत चाललेल्या प्रजातीच्या रक्षणाचा संदेश दिला होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रोहितनं समुद्रात प्लास्टिक फेकू नका, असे आवाहन केलं होतं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021: Rohit Sharma wore the shoes with the message ‘Save the Corals’ during MI vs SRH clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.