IPL 2021: गोलंदाजांची कामगिरी  अपेक्षेप्रमाणे नाही - महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni : सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘आम्हाला चांगली गोलंदाजी करता आली असती. गोलंदाजांना अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नाही. त्यांनी यातून बोध घेतला असून, यानंतर होणाऱ्या लढतींमध्ये चांगली कामगिरी करतील.’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 07:12 AM2021-04-12T07:12:51+5:302021-04-12T07:13:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Bowlers' performance not as expected - MS Dhoni | IPL 2021: गोलंदाजांची कामगिरी  अपेक्षेप्रमाणे नाही - महेंद्रसिंग धोनी

IPL 2021: गोलंदाजांची कामगिरी  अपेक्षेप्रमाणे नाही - महेंद्रसिंग धोनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : ‘दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी चुकांपासून बोध घ्यायला हवा,’ अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली. विजयासाठी १९८ धावांचे लक्ष्य दिल्लीने ३ गड्यांच्या मोबदल्यात ८ चेंडू राखून पूर्ण केले. शिखर धवनने ८५ व पृथ्वी शॉने ७२ धावांची खेळी केली. सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘आम्हाला चांगली गोलंदाजी करता आली असती. गोलंदाजांना अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नाही. त्यांनी यातून बोध घेतला असून, यानंतर होणाऱ्या लढतींमध्ये चांगली कामगिरी करतील.’
धोनी पुढे म्हणाला, ‘लढतीत दवाचा प्रभाव अनुभवाला मिळाला. त्याचा विचार करता आम्ही जास्तीत जास्त धावा फटकावण्यास प्रयत्नशील होतो.’ ख्रिस व्होक्स व आवेश खान यांनी दिल्लीला वेगवान गोलंदाजीत कागिसो रबाडा व एनरिच नॉर्खिया यांची उणीव भासणार नाही, याची खबरदारी घेतली. . 
पंत म्हणाला,‘सामना जिंकल्यानंतर सर्वकाही चांगले होते. मधल्या षटकांमध्ये दडपणाखाली होते, पण आवेश व अन्य गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. नॉर्खिया व रबादा यांच्याविना काय करणार, असा विचार केला होता, पण आम्ही उपलब्ध पर्यायांमध्ये सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड केली.’ पंतने धवन व पृथ्वी या सलामी जोडीची प्रशंसा केली. तो म्हणाला की,‘पृथ्वी व शिखर यांनी पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांनी दडपण न बाळगता चौकार-षटकार वसूल केले.’

नाणेफेकीला धोनीसोबत जाणे विशेष - पंत
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘ राष्ट्रीय संघात त्याचा मेंटर राहिलेल्या धोनीसोबत नाणेफेकीसाठी जाणे विशेष असल्याचे सांगितले. पंत म्हणाला,‘ आयपीएलमध्ये नेतृत्व करणे व एमएससोबत (धोनी) नाणेफेकीला जाणे विशेष होते. मी त्याच्याकडून शिकलो असून, कठीण समयी त्याच्यावर विश्वास ठेवतो.’

Web Title: IPL 2021: Bowlers' performance not as expected - MS Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.