IPL 2021 ball change due in delhi capitals vs mumbai indians kieron pollard and kl rahul | IPL 2021: केएल राहुलसोबत पंचांनी केला भेदभाव, पोलार्डला केली मदत!; नेमकं प्रकरण काय?

IPL 2021: केएल राहुलसोबत पंचांनी केला भेदभाव, पोलार्डला केली मदत!; नेमकं प्रकरण काय?

IPL 2021: आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामन्यात देखील दवाची भूमिका अतिशय महत्वाची ठरली. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर दव पडल्यामुळे चेंडू खूप ओला होत होता. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांना अडचणींना सामोरं जावं लागत होतं. रोहित शर्माच्या गैरहजेरीत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व कायरन पोलार्ड करत होता. यावेळी पोलार्डनं सामन्याच्या पंचांकडे अनेकदा चेंडू बदलून देण्याची मागणी केली. भरपूर विनवणी केल्यानंतर पंचांनी चेंडू बदलण्याची परवानगी दिली. पण अशीच परिस्थिती केएल राहुलसोबत देखील उद्भवली होती. त्यावेळी पंचांनी चेंडू बदलण्यास नकार दिला होता. (IPL 2021 ball Change Due In Delhi Capitals VS Mumbai Indians Kieron Pollard And KL Rahul)

२० वर्षांचा, नव्या दमाचा खेळाडू घेणार मनिष पांडेची जागा? आज हैदराबादचा सूर्योदय होणार?

केएल राहुलनं सामन्याच्या दुसऱ्या डावात संघाला चेंडू बदलण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यायला हवा, अशी मागणी सामन्यानंतर केली होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलनं ही मागणी केली होती. या सामन्यात पंजाबच्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 

महेंद्रसिंग धोनीच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

दुसरीकडे, मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दुसऱ्या डावात दव पडलं आणि चेंडू ओला होत असल्याची तक्रार मुंबईच्या कायरन पोलार्डनं पंचांकडे केली. चेंडू भरपूर ओला होत असल्यानं फिरकी गोलंदाजांना चांगली ग्रिप मिळत नव्हती. त्यामुळे पोलार्डनं पंचांकडे चेंडू बदलण्याची मागणी लावून धरली. पण पंचांनी नियमांकडे बोट दाखवत चेंडू बदलण्यास नकार दिला. पोर्लाड काही त्याच्या मागणीवरून मागे हटला नाही. अखेरीस पंचांनी पोलार्डला नवा चेंडू वापरण्यास परवानगी दिली. सामन्याच्या १४ व्या षटकाच्या आधी चेंडू बदलण्यात आला. मुंबईच्या संघाला याचा कोणताही फायदा झाला नाही. सामना गमावावा लागला. पण पोलार्डसोबत वेगळा न्याय आणि केएल राहुलसोबत वेगळा यावरुन वाद सुरू झाला आहे. 

रोहित शर्माला एक न्याय अन् लोकेश राहुलवर अन्याय; इरफान पठाण संतापला, नवा वाद छेडला!

१८ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात केएल राहुलनं ओला झालेला चेंडू बदलण्याची पंचांकडे मागणी केली होती. पण त्यास नकार देण्यात आला होता. केएल राहुलनं भरपूर वेळा पंचांकडे याबाबतची तक्रार केली. पण आयपीएलच्या नियमांमध्ये असं करणं बसत नसल्याचं सांगून पंचांनी नवा चेंडू देण्यास नकार दिला होता. रात्रीच्या वेळेस मैदानात दव पडत असल्यानं सामन्याच्या दुसऱ्या डावात खेळणाऱ्या संघाला मोठं नुकसान होतं, असं केएल राहुलनं म्हटलं होतं. गोलंदाज नेट्समध्ये ओल्या चेंडूनं सराव करतात पण सामन्यावेळी दबावाच्या स्थितीत देखील याचा काही फायदा होत नाही, असंही तो म्हणाला होता. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 ball change due in delhi capitals vs mumbai indians kieron pollard and kl rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.