IPL 2020 Mid Season Transfer window आजपासून उघडली; जाणून घ्या कोणते खेळाडू जाऊ शकतात दुसऱ्या संघात!

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिघांनी ७ पैकी ५ सामने जिंकून प्रत्येकी १० गुणांसह Point Tableमध्ये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना आता उर्वरीत ७ पैकी ३ विजयही Play Off मध्ये स्थान पक्के करण्यासाठी पुरेसे आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: October 13, 2020 08:00 AM2020-10-13T08:00:00+5:302020-10-13T08:00:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Mid Season Transfer window opened from today; Find out eligible players of all 8 teams | IPL 2020 Mid Season Transfer window आजपासून उघडली; जाणून घ्या कोणते खेळाडू जाऊ शकतात दुसऱ्या संघात!

IPL 2020 Mid Season Transfer window आजपासून उघडली; जाणून घ्या कोणते खेळाडू जाऊ शकतात दुसऱ्या संघात!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) चे १३वे पर्व मध्यंतरात आले आहे. सर्व संघांनी त्यांच्या वाट्यातील १४ पैकी निम्मे म्हणजेच प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२०च्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) या दोन संघांची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. स्फोटक सुरुवात करून देणारे सलामीवीर, गडगडणारा डाव सावरणारी भक्कम मधली फळी, अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडणारे धडाकेबाज फलंदाज, प्रतिस्पर्धींच्या धावांवर वेसण घालणारे गोलंदाज अन् चपळ क्षेत्ररक्षक या सर्व आघाड्यांवर MI व DC हे दोन्ही संघ इतरांपेक्षा उजवे ठरत आहेत. पण, यंदा सप्राईज पॅकेज ठरत आहेत तो विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore)...

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिघांनी ७ पैकी ५ सामने जिंकून प्रत्येकी १० गुणांसह Point Tableमध्ये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना आता उर्वरीत ७ पैकी ३ विजयही Play Off मध्ये स्थान पक्के करण्यासाठी पुरेसे आहेत. पण, उरलेल्या एका जागेसाठी चांगली चुरस रंगण्याची शक्यता आहे. त्यात Mid Season Transfer मुळे पहिल्या टप्प्यातील उणीवा दूर करण्यासाठी सर्व संघ आपापल्या ताफ्यात आवश्यक तो बदल करण्यासाठी खेळाडूंची अदलाबदलही करणार आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंसह सर्व संघ प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी जीवाचं रान करेल हे मात्र नक्की.


 
काय आहे हे IPL 2020 Mid-Season Transfers? 
BCCIने यंदाच्या मोसमापासून फ्रँचायझींना अन्य संघांकडून खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा दिली आहे. मागील मोसमात ही संधी केवळ अन कॅप म्हणजेच राष्ट्रीय संघांकडून न खेळलेल्या खेळाडूंपुरती मर्यादित होती, परंतु आता राष्ट्रीय खेळाडूंचीही अदलाबदल शक्य आहे.

IPL 2020 Mid-Season Transfers नियम 
लीगच्या मध्यंतरापर्यंत खेळाडूनं दोनपेक्षा अधिक सामने खेळलेले नसावेत. लीगच्या मध्यंतरानंतरच ही अदलाबदल करता येणार आहे. म्हणजे प्रत्येक संघानं प्रत्येकी ७ सामने खेळणे आवश्यक आहेत.

कोणते खेळाडू ठऱणार पात्र? 
दोनपेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंची अदलाबदल करता येईल.
अदलाबदल करताना खेळाडूला देण्यात येणारी रक्कम फ्रँचायझीच्या पर्समधून वजा होणार नाही.

कोणत्या संघातील कोणते खेळाडू ठरत आहेत पात्र ?

  • चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - केएम आसीफ, इम्रान ताहीर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, आर साई किशोर, जोश हेझलवूड
  • दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) - अजिंक्य रहाणे, आवेश खान, किमो पॉल, संदीप लामीछाने, अॅलेक्स कॅरी, ललित यादव, डॅनिएल सॅम्स, तुषार देशपांडे, मोहित शर्मा
  • किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) - अर्षदीप सिंग, दर्शन नळखांडे, कृष्णप्पा गोवथम, हार्डस विलजोईन, ख्रिस गेल, हरप्रीत ब्रार, जगदीशा सुचिथ, मनदीप सिंग, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, दीपक हुडा, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, सिमरन सिंग, तजींदर सिंग
  • कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर्स, सिद्धेश लाड, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, टॉम बँटन, निखिल नाईक, अली खान

  • मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) - आदित्य तरे, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, जयंत यादव, शेर्फान रुथरफोर्ड, मिचेल मॅक्लेघन, ख्रिस लीन, नॅथन कोल्टर नील, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय ( मुंबई इंडियन्सच्या ख्रिस लीनने एकही सामना खेळलेला नाही. त्याच्यासाठी चढाओढ रंगू शकते.)
  • सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - बसील थम्पी, बिली स्टँनलेक, मोहम्मद नबी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, वृद्धीमान सहा, विजय शंकर, विराट सिंग,
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) - गुरकिरत सिंग मान, मोइन अली, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, अॅडम झम्पा
  • राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - मयांक मार्कंडे, अंकित राजपूत, मनन वोहरा, महिपाल लोम्रेर, शंशांक सिंग, वरूण आरोन, कार्तिक त्यागी, ओशाने थॉमस, अनिरुद्ध जोशी, अँण्ड्रू टे, आकाश सिंग, अनुज रावत
     

 

Web Title: IPL 2020 Mid Season Transfer window opened from today; Find out eligible players of all 8 teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.