IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियम बदलला; IPL फ्रँचायझींना मोठा दिलासा मिळाला

IPL 2020: BCCIच्या नियमानुसार UAEत दाखल होणाऱ्या प्रत्येकाला सहा दिवसांच्या क्वाराटाईन कालावधीत राहणे अनिवार्य आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 08:23 PM2020-09-17T20:23:04+5:302020-09-17T20:23:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: England, Australia players arriving in UAE will undergo 36-hour quarantine instead of 6 days | IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियम बदलला; IPL फ्रँचायझींना मोठा दिलासा मिळाला

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियम बदलला; IPL फ्रँचायझींना मोठा दिलासा मिळाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाला दोन दिवसात सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यात 19 सप्टेंबरला सलामीचा सामना रंगणार आहे. पण, IPL मध्ये परदेशी खेळाडूंना काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. BCCIच्या नियमानुसार UAEत दाखल होणाऱ्या प्रत्येकाला सहा दिवसांच्या क्वाराटाईन कालावधीत राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या एकूण 21 खेळाडूंना काही सामने मुकावे लागेल अशी शक्यता होती. पण, या खेळाडूंसाठी बीसीसीआयनं नियम बदलला आहे. या खेळाडूंना आता 6 दिवसांसाठी नव्हे तर 36 तासांसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. 

CSKनं रवींद्र जडेजाला दिली स्पेशल 'तलवार'; MS Dhoni, ब्राव्होसह केला अनेकांचा सत्कार

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका बुधवारी संपली आणि त्यानंतर IPLमधील खेळाडू UAEसाठी रवाना झाले. त्यांना आता 36 तास क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुलीनं फ्रँचायझींची अडचण समजूत घेत तोडगा शोधून काढला. '' इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना 6 दिवस नाही, तर 36 तास क्वारंटाईन रहावं लागेल. त्यामुळे अनेक संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यापासूनच या खेळाडूंसह खेळता येईल,''अशी माहिती IPLच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. 

पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचे ट्वेंटी-20त शतक; विराट-रोहितलाही टाकलं मागे

स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, जोफ्रा आर्चर, जोस बटलर हे गुरुवारी रात्रीपर्यंत UAEत दाखल होतील. त्यांची पुन्हा कोरोना चाचणी होईल. ''विमानात बसण्यापूर्वी त्यांची एक कोरोना चाचणी होईल आणि त्यानंतर येथे दाखल झाल्यावर एक चाचणी केली जाईल. त्यांना कोरोना चाचणीचे नियम काटेकोर पाळावेच लागतील. हे सर्व खेळाडू बायो-बबलमधून येत आहेत, म्हणून हा निर्णय घेतला गेला,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं PTIला सांगितले. 

विराट कोहलीच्या RCBचा स्तुत्य उपक्रम; अनोख्या पद्धतीनं कोरोना वॉरियर्सचा करणार सन्मान, Video

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेत IPLमध्ये खेळणारे कोणते खेळाडू आहेत?
आयपीएल 2020 साठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळाडूंना सर्वाधिक 86.7 कोटी इतकी रक्कम मिळाली. इंग्लंडच्या 11 खेळाडूंना 43.8 कोटी रुपये मिळाले.

चेन्नई सुपर किंग्स - सॅम कुरन, जोश हेझलवूड, शेन वॉटसन
दिल्ली कॅपिटल्स - अॅलेक्स करी, जेसन रॉय, मार्कस स्टॉयनिस
कोलकाता नाइट रायडर्स - पॅट कमिन्स, ख्रिस ग्रीन , इयॉन मॉर्गन, टॉम बँटन
किंग्स इलेव्हन पंजाब - ख्रिस जॉर्डन, ग्लेन मॅक्सवेल
सनरायझर्स हैदराबाद - जॉनी बेअरस्टो, मिचेल मार्शस, डेव्हीड वॉर्नर
राजस्थान रॉयल्स - जोफ्रा आर्चर, जोस बटलर, टॉम कुरन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अँड्य्रू टाय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - मोईन अली, अॅरोन फिंच, जे. फिलिफ, अॅडम झम्पा

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्स चाहत्यांसाठी Rohit Sharmaने दिली Big News; IPL 2020साठी आखलाय खास प्लान

ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली, शतकवीर ग्लेन मॅक्सवेलनं मोडला कपिल देव यांचा विक्रम 

धक्कादायक; मुंबईच्या माजी क्रिकेटपटूचा करोनामुळे मृत्यू

महेंद्रसिंग धोनीचा चायनिज कंपनी OPPOशी करार, तयार केलाय खास Video

रोहित शर्मा, ख्रिस लीन की क्विंटन डी'कॉक; यापैकी सलामीला कोण येणार? MIने दूर केला सस्पेन्स 

Web Title: IPL 2020: England, Australia players arriving in UAE will undergo 36-hour quarantine instead of 6 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.