लॉकडाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं त्याच्या कुटुंबीयांसह TikTok Videoचा धडाका लावला आहे. त्याच्या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अलू अर्जुन यानंही वॉर्नरच्या व्हिडीओचे कौतुक केले. आता तर भारताच्या मोठ्या दिग्दर्शकानं ऑस्ट्रेलियन सलामीवीराला चित्रपटाची ऑफर दिली आहे. वॉर्नरनंही त्यांना मजेशीर उत्तर दिले आहे.
वॉर्नरनं रविवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो महेश बाबू याच्या 2006च्या पोकिरी या चित्रपटाचं डायलॉग बोलताना दिसत आहे. या डायलॉग बोलताना त्यानं सनरायझर्स हैदराबाद संघाची जर्सी घातली आणि हातात बॅट पकडली आहे.  
वॉर्नरचा नवा व्हिडीओ पाहून पोकरी चित्रपटाचे दिग्दर्शक पुरू जग्नाथ यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली. त्यांनी लिहिलं की,''
डेव्हिड वॉर्नर तुला ही आक्रमक स्टाईल सूट करते. हा डायलॉग तुला शोभतो. तू चांगला अभिनेता आहेस. आशा करतो की तू माझ्या चित्रपटात रोल करशील.''
यावर वॉर्नर म्हणाला,''सर मी प्रयत्न करतोय. पण, सनरायझर्स हैदराबाद संघ मला ट्रेड किंवा रिलीज करतो का ते पाहा.''
धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी 
वीरेंद्र सेहवाग खोटारडा; Shoaib Akhtar चा धक्कादायक दावा!
महाराष्ट्र पोलिसांप्रति Sachin Tendulkarनं व्यक्त केली कृतज्ञता; मानले आभार
टीम इंडियाच्या शिलेदारांचे बालपणीचे फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का?