टीम इंडियाच्या शिलेदारांचे बालपणीचे फोटो; बघा तुम्हाला ओळखता येतात का?

भारतीय क्रिकेटपटूंनी 10 मे रोजी मातृदिनानिमित्त आपापल्या आईसोबतचे बालपणीचे फोटो शेअर केले. या फोटोतील अनेक खेळाडूंना तुम्ही ओळखूही शकणार नाही.

हा फोटो अनेकांच्या ओळखीचा आहे. भारतीय संघाच्या कर्णधारानं 86 कसोटी, 248 वन डे आणि 82 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 70 आंतरराष्ट्रीय शतकंही आहेत.

हा फोटो भारताच्या सलामीवीराचा आहे. तो मधल्या फळीतही येऊन जोरदार फटकेबाजी करतो. सध्या त्याच्याकडे यष्टिरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू. कमी चेंडूंत चौकार-षटकारांची आतषबाजी करून सामन्याचं चित्रच हा बदलून टाकतो. सध्या दुखातपीमुळे हा संघाबाहेर आहे.

अंगठा चुपणाऱ्या या खेळाडूला आज जगातील फलंदाज घाबरतात. त्याचा यॉर्करचा मारा भल्याभल्या फलंदाजांना हतबल करतो.

या खेळाडूनं टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची कमी भरून काढली आहे. त्यानं न्यूझीलंड दौऱ्यात तीन वन डे सामन्यांत 103, 52 आणि 62 धावा चोपल्या.

भारताकडून या गोलंदाजानं 12 वन डे आणि 2 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत.

हा फोटो क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा हा बालपणीचा फोटो आहे. आता उर्वरित खेळाडूंना तुम्ही ओळखले नसेल तर आम्ही सांगतो. वरील फोटो विराट कोहली, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि धवल कुलकर्णी यांचे आहेत.