India vs West Indies, 1st Test: Team India-West Indies first test start from today, race for 120 point in WTC21 | India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया-विंडीज भिडणार; 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार?

India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया-विंडीज भिडणार; 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार?

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कसोटी : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसोटीचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक मालिकेला 120 गुण दिले जाणार आहेत आणि त्यात सर्वाधिक गुण मिळवणारा संघ गुणतालिकेत आगेकूच करत राहणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात या 120 गुणांसाठीची शर्यत आजपासून सुरू होणार आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियमवर आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.


आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अॅशेस मालिकेतून सुरुवात झाली. पण, भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना उद्यापासून खेळणार आहे. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे.  अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईला आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल. या स्पर्धेतील भारतीय मोहिमची सुरुवात आजपासून होत आहे.

रोहित टेस्टमध्येही सलामीला खेळू शकतो, 'हिटमॅन'साठी गांगुलीची फटकेबाजी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक मालिकेत 120 गुण देण्यात येणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे 120 गुणांची दोन सामन्यांत विभागणी होईल. त्यानुसार विजयी संघाला 60 गुण मिळतील. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 20-20 गुण, तर बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी 30-30 गुण दिले जातील. आता या 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. त्यात श्रीलंकेने 60 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे ते 32 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने इंग्लंडने खाते उघडले आहे आणि ते 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत.

दिवसभराच्या बातम्या

टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!

रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे यांच्यामुळे संघ बळकट होईल

नव्या जर्सीबद्दल काय सांगतायत भारतीय खेळाडू, पाहा व्हिडीओ

विंडीजला धक्का; 'गब्बर'ची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची पहिल्या कसोटीतून माघार

कोहली, पंत, बुमराह यांना इतिहास घडवण्याची संधी; खुणावतायत सात विक्रम

टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs West Indies, 1st Test: Team India-West Indies first test start from today, race for 120 point in WTC21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.