India vs West Indies 1st Test, Live Streaming: When & where to watch, Telecast, Time in IST | India vs West Indies, 1st Test : टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे?
India vs West Indies, 1st Test : टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे?

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू होत आहे. यापूर्वी झालेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. सराव सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष होते. त्यानुसार चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, उमेश यादव यांनी चमक दाखवून कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. त्यामुळे मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना होणार असूत येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक मानली जाते. त्यामुळे कर्णधार विराट कोहली चार स्पेशालिस्ट फार्स्ट गोलंदाजांसह मैदानावर उतरणार आहे. 

India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!

भारताने हा सामना जिंकल्यास कर्णधार म्हणून कोहलीचा 27 वा कसोटी विजय ठरेल आणि तो धोनीची बरोबरी करेल. या सामन्यात विराटने शतक ठोकल्यास कर्णधार म्हणून 19 व्या शतकासह तो रिकी पॉंटिंगच्या विक्रमाशीही बरोबरी करेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसोटीचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. 

  • स्थळ - सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा 
  • सामन्याची वेळ - सायंकाळी 7 वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)
  • थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनेलवर - सोनी टेन 1 व 3


 

संभाव्य संघ
भारत  -  विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव 

वेस्ट इंडिज - जेन होल्डर ( कर्णधार ), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार्ह ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, राहकीम कोर्नवॉल, शेन डॉवरीच, शॅनोन गॅब्रीएल, शिमरोन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच.


 

भारताचं 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' उद्यापासून; जाणून घ्या कसे अन् किती मिळणार गुण!

रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे यांच्यामुळे संघ बळकट होईल

नव्या जर्सीबद्दल काय सांगतायत भारतीय खेळाडू, पाहा व्हिडीओ


Web Title: India vs West Indies 1st Test, Live Streaming: When & where to watch, Telecast, Time in IST
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.