अँटिग्वा : अजिंक्य रहाणेने झळकावलेले दहावे शतक व हनुमा विहारीच्या 93 धावांनंतर जसप्रीत बुमराहने अवघ्या 7 धावांत घेतलेल्या 5 बळींमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 318 धावांनी धुव्वा उडविला. रविवारी, चौथ्या दिवशी विजयासाठी 419 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान दुसऱ्या डावात 100 धावांवर गारद झाला. यासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतानाच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी देताना गुणांचे खातेही उघडले.
विशेष म्हणजे, विंडीजच्या सर्व फलंदाजांना भारताच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनी बाद केले. इशांतने 31 धावांत 3 तर, शमीने 13 धावांत 2 बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली. एकवेळ विंडीजच्या 9 बाद 50 धावा झाल्या होत्या. त्यानंतर केमार रोच (36) आणि कमिन्स (नाबाद 19) या जोडीने दहाव्या विकेटसाठी 50 धावा जोडत पराभव लांबविला. अखेर इशांतने रोचला बाद करीत भारताच्या विजयावर शिक्का मारला. भारताने उपाहारानंतर एका तासाने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. रहाणेने 102 धावा केल्या, तर विहारी 93 धावांवर बाद झाला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 135 धावांची भागीदारी केली. विहारी बाद होताच कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित केला.
कसोटी वर्ल्ड कप'च्या गुणतालिकेत टीम इंडियाची भरारी; वाचा कोण कितव्या स्थानी
या विजयानंतर हिटमॅन रोहित शर्मा याने बीसीसीआय टिव्हीवर जसप्रीत बुमराह आणि अजिंक्य रहाणेची मुलाखत घेतली. त्यात रहाणे म्हणाला,'' पहिला डावातील खेळी ही महत्त्वाची होती. संघ त्यावेळी अडचणीत होता आणि त्यावेळी मला साजेशी कामगिरी करता आली याचे समाधान. माझ्या खेळावर अनेक जण चर्चा करत होते. 50 चे शंभरमध्ये रुपांतर करता येत नाहीत, असे बोलले जात होते. दुसऱ्या डावात मी शंभर धावा केल्या. माझ्या कठीण प्रसंगी जे माझ्यासोबत राहिले, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, पाठीशी उभे राहिले त्यांना हे शतक समर्पित करतो. मैदानावर असताना टीकाकारांच्या बोलणेकडे मी लक्ष न देण्याचा प्रयत्न करतो. ती माझ्या दृष्टीने महत्त्वाची बाब नाही.''
कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय
कॅप्टन कोहलीचा बोलबाला, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा विजय
कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी
बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम
वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट
पाहा व्हिडीओ...