India vs South Africa, 1st ODI : The 1st ODI between India and South Africa has been abandoned due to rains svg | India vs South Africa, 1st ODI : पावसाचा खेळ, पहिला वन डे सामना एकही चेंडू न टाकता रद्द

India vs South Africa, 1st ODI : पावसाचा खेळ, पहिला वन डे सामना एकही चेंडू न टाकता रद्द

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. हा सामना दुपारी १.३० सुरू होणार होता, पण पावसानं अजूनही विश्रांती घेतलेली नाही. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे नाणेफेकही झालेली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यानं अखेरीस साडेपाचच्या सुमारास हा सामना रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयनं केली. 

Big News : मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्रालय IPL 2020 आयोजनाच्या विरोधात, पण...

बुधवारीही धरमशाला येथे पाऊस पडला होता. त्यामुळे गुरुवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होतीच. पावसामुळे १ वाजता होणारी नाणेफेक लांबणीवर गेली. १.१५ वाजता खेळपट्टीची पाहणी करण्यात येणार होती, परंतु पाऊस थांबला नाही. त्यामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. दोन तास पावसानं वाया घालवल्यानंतर बीसीसीआयनं Cut Off वेळ जाहीर केला होता. जर सामना सुरू होण्यासाठी ६.३० वाजले तर तो प्रत्येकी २०-२० षटकांचा होईल, असे जाहीर केले गेले. पण, साडेतीन सात पावसाचा जोर कायम राहिल्यानं अखेरीस सामना रद्द करावा लागला. 

२०१९मध्ये उभय संघांमध्ये धरमशाला येथे झालेला एकमेव ट्वेंटी-२० सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर ती मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. तीन वन डे सानम्यांच्या मालिकेतील दुसरा सामना १५ मार्चला लखनऊ येथे होईल, त्यानंतर १८ मार्चला कोलकाता येथे अखेरचा सामना होणार आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक

Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका

मोठा निर्णय, सचिन-वीरूची फलंदाजी प्रत्यक्ष पाहता येणार नाही!

OMG : आंतरराष्ट्रीय खेळाडूला Corona Virusची लागण, संपूर्ण लीग करावी लागली रद्द

BCCI ची कोंडी; IPL 2020 चा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs South Africa, 1st ODI : The 1st ODI between India and South Africa has been abandoned due to rains svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.