IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक

येत्या १४ मार्चला म्हणजेच शनिवारी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक बोलावली आहे. त्यात आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे भवितव्य ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:07 AM2020-03-12T10:07:44+5:302020-03-12T10:08:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 could be held without spectators or postponed amid coronavirus scare svg | IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक

IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल 2020 ) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचे सावट अजूनही कायम आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्याच्या किंवा बंद स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने बुधवारी मुंबईत होणारे सामन्यांच्या तिकीट विक्रीवर बंदी घातल्यानंतर अन्य राज्यांतही तसे आदेश निघण्याची शक्यता आहे. या सर्व पाश्वर्भूमीवर IPL 2020 संदर्भात लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे सांगितले असले तरी याबाबत येत्या दोन दिवसांत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. येत्या १४ मार्चला म्हणजेच शनिवारी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक बोलावली आहे. त्यात आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे भवितव्य ठरणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली आणि सचिव जय शाह हेही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. 

काही संघ मालकांनी ही स्पर्धा बंद दरवाजात खेळवावी असा प्रस्ताव ठेवला आहे. इंग्लिश प्रीमियर लीग, ला लीगा आणि सीरी ए लीग आदी महत्त्वाच्या फुटबॉल स्पर्धाही बंद स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहेत. तसेच आयपीएलमध्येही  होऊ शकते. पण येत्या शनिवारी यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होईल.

Web Title: IPL 2020 could be held without spectators or postponed amid coronavirus scare svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.