भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात साजेशी झाली नाही. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली झटपट माघारी परतले. मात्र, मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. मयांकनं दुसरे वैयक्तित द्विशतक झळकावताना भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. या सामन्यात मयांकनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. टीम इंडियानं दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 493 धावा करताना 343 धावांची आघाडी घेतली आहे. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला.
02:05 PM
भारताच्या तीनशे धावा पूर्ण
भारताच्या तीनशे धावा पूर्ण, मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे मैदानात
11:03 AM
अजिंक्य रहाणेच्या कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण
10:07 AM
मागील 11 डावांत कोहली तिसऱ्यांदा शून्यावर माघारी परतला
