India vs Bangladesh, 1st Test: गांगुलीनंतर कॅप्टन कोहलीनं नोंदवला नकोसा विक्रम; कपिल देव यांच्याशी बरोबरी 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 10:30 AM2019-11-15T10:30:50+5:302019-11-15T10:31:22+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh, 1st Test: Virat Kohli become a 2nd Indian captain out duck in International cricket against Bangladesh | India vs Bangladesh, 1st Test: गांगुलीनंतर कॅप्टन कोहलीनं नोंदवला नकोसा विक्रम; कपिल देव यांच्याशी बरोबरी 

India vs Bangladesh, 1st Test: गांगुलीनंतर कॅप्टन कोहलीनं नोंदवला नकोसा विक्रम; कपिल देव यांच्याशी बरोबरी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भारताच्या गोलंदाजांनी फक्त 150 धावांमध्ये बांगलादेशचा पहिला डाव आटोपला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे त्यांची दिवसअखेर 1 बाद 86 अशी स्थिती आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न भारतीय संघ बघत आहे. भारताचा संघ सध्या 64 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात साजेशी झाली नाही. बांगलादेशच्या अबू जावेदनं भारताला दोन धक्के दिले. त्यानं चेतेश्वर पुजाराला झेलबाद करून माघारी पाठवले. पुजारानं 72 चेंडूंत 9 चौकार लगावत 54 धावा केल्या. त्याचे हे 24 वे अर्धशतक ठरले. त्यानंतर अबू जावेदनं कर्णधार विराट कोहलीलाही पायचीत करून तंबूत पाठवले आणि तेही शून्य धावावर असताना. मागील 11 डावांमध्ये कोहली तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. 

बांगलादेशविरुद्ध शून्यावर माघारी परतणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी सौरव गांगुली 2004 च्या वन डे सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर 15 वर्षांनी भारतीय कर्णधारावर ही नामुष्की ओढावली. 

कसोटीत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे भारतीय कर्णधार
8 - महेंद्रसिंग धोनी ( 96 डाव)
7 - मन्सूर अली खान पतौडी ( 73 डाव)
6- कपिल देव ( 48 डाव)  
6- विराट कोहली (85 डाव) 

Web Title: India vs Bangladesh, 1st Test: Virat Kohli become a 2nd Indian captain out duck in International cricket against Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.