India Playing XI 3rd Test : तिसऱ्या कसोटीत आर अश्विन अंतिम ११मध्ये खेळणार, जाणून घ्या कोण बाकावर बसणार!

India Playing XI 3rd Test: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियानं दोन सामन्यांनंतर १-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 11:28 AM2021-08-21T11:28:17+5:302021-08-21T11:28:43+5:30

whatsapp join usJoin us
India Playing XI 3rd Test: R Ashwin likely to make a comeback replacing wicket-less Ravindra Jadeja | India Playing XI 3rd Test : तिसऱ्या कसोटीत आर अश्विन अंतिम ११मध्ये खेळणार, जाणून घ्या कोण बाकावर बसणार!

India Playing XI 3rd Test : तिसऱ्या कसोटीत आर अश्विन अंतिम ११मध्ये खेळणार, जाणून घ्या कोण बाकावर बसणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Playing XI 3rd Test: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियानं दोन सामन्यांनंतर १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीतील टीम इंडियाच्या विजयावर पावसानं पाणी फिरवले, त्यानंतर लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून टीम इंडियानं आघाडी घेतली. आता तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात आर अश्विनचे कमबॅक होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पहिल्या दोन कसोटींत भारतीय संघ चार जलदगती गोलंदाज व एक फिरकीपटू या कॉम्बिनेशनसह मैदानावर उतरले होते. पण, लीड्स कसोटीत टीम इंडिया बदल करण्याच्या तयारीत आहे आणि अश्विनच्या पुनरागमनानं कोणाला बाकावर बसवलं जाईल, ते पाहावं लागेल.

तू भाल्यावर स्वाक्षरी कर. मी त्याचा लिलाव करतो...; नीरज चोप्राला असे का म्हणाले पंतप्रधान मोदी?

तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाच्या जागी आर अश्विनला खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त insidesportने दिले आहे. दोन कसोटींत रवींद्र जडेजाला ४४ षटकं फेकूनही विकेट घेता आली नाही. जडेजा फलंदाजीतही कमाल दाखवतो, त्यामुळे कर्णधार विराट कोहलीची पहिली पसंती ही जडेजा होता. पहिल्या कसोटीत जडेजानं १६ षटकांत ३.३०च्या सरासरीनं धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. दुसऱ्या कसोटीतही २८ षटकांत ४८ धावा देताना त्याची विकेटची पाटी कोरीच राहिली. इंग्लंडच्या फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यात तो अपयशी ठरला, दुसरीकडे इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीनं तीन विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानचे ३ फलंदाज २ धावांवर परतले माघारी, गर्मीमुळे तिघांनी सोडलं मैदान; विंडीजसमोर झाली वाईट अवस्था

संभाव्य संघ - लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शणी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा/रवींद्र जडेजा ( खेळपट्टीचा अंदाज) ( India’s likely Playing XI for 3rd Test: Openers: KL Rahul, Rohit Sharma, No 3: Cheteshwar Pujara, No 4: Virat Kohli, No 5: Ajinkya Rahane, No 6: Rishabh Pant, No 7: Ravichandran Ashwin, No 8: Mohammed Shami, No 9: Jasprit Bumrah, No 10: Mohammed Siraj, No 11: Ishant Sharma/Ravindra Jadeja (Depending on conditions).
 

Web Title: India Playing XI 3rd Test: R Ashwin likely to make a comeback replacing wicket-less Ravindra Jadeja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.