IND vs SA Ruturaj Gaikwad Maiden Century : भारतीय संघात जवळपास दोन वर्षांनी कमबॅकची संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडनं संधीचं सोनं करुन दाखवलं आहे. पहिल्या डावात अल्प धावसंख्येवर तंबूत परतल्यामुळे त्याला दुसऱ्या वनडेत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल का? असा प्रश्न होता. भारतीय संघाने त्याच्यावर विश्वास ठेवला अन् त्यानंही आपल्या खेळीतील खास धमक दाखवून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऋतुराज गायकवाडनं पहिल्या शतकासह सेट केला हा खास विक्रम
रायपूरच्या मैदानातील दुसऱ्या वनडे सामन्यात पुणेकर ऋतुराज गायकवाड याने ८ वा वनडे सामना खेळताना कारकिर्दीतील पहिली वहिली सेंच्युरी झळकावली आहे. ७७ व्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकत त्याने शतक पूर्ण केले. यशस्वी जैस्वालच्या रुपात भारतीय संघाला ६२ धावांवर दुसरा धक्का बसला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋतुराज गायकवाडनं टी-२० स्ट्राइलमध्ये फटकेबाजी करत कोहलीसोबत दमदार भागीदारी रचली. या खेळीसह ऋतुराज हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेत सर्वात जलद शतक झळकवणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत फक्त युसूफ पठाण त्याच्या पुढे आहे. युसूफ पठाण याने २०११ मध्ये ६८ चेंडूत शतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
या गोष्टीमुळे त्याची पहिली सेंच्युरी ठरते एकदम खास
ऋतुराज गायकवाड हा व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये सलामीवीराच्या रुपात खेळतो. आतापर्यंतच्या कारकि्दीत त्याने तिसऱ्या क्रमांकापेक्षा खालच्या क्रमांकावर कधीच फलंदाजी केलेली नाही. पण यावेळी टीम इंडियात संधी मिळाल्यावर त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले. या क्रमांकावरही त्याने आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे.
भारत 'अ' संघाकडून दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या मालिकेत धमक दाखवली अन् टीम इंडियात मारली एन्ट्री
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कोलकाता कसोटी सामन्यातून भारताच्या दौऱ्याला सुरुवात केली. त्याआधी भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यात मालिका खेळवण्यात आली होती. या द्विपक्षीय मालिकेत भारत 'अ' संघाकडून ऋतुराज गायकवाडनं शतकी खेळीसह लक्षवेधी कामगिरी करत भारतीय संघाच्या मालिका विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यामुळे त्यांची उणीव भरून काढण्यासाठी निवडकर्त्यांनी ऋतुराजवर भरवसा दाखवला. त्यानेही शतकी खेळीसह सलामीवीराच्या रुपातच नव्हे तर मध्यफळीतल खेळण्यासही सक्षम आहे, हे दाखवून दिले आहे.