भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रविवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर खेळपट्टी आणि संघाच्या पराभवावर रोखठोक मत व्यक्त केले. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना तिसऱ्या दिवशी संपला. त्यामुळे खेळपट्टीचा मुद्दा चर्चेत आहे. गंभीर यांनी सांगितले, की पिच अगदी त्यांच्या मागणीनुसार तयार करण्यात आले होती; मात्र त्यांच्या मते भारतीय फलंदाजांनी फिरकीचा योग्य सामना केला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खेळपट्टीसंदर्भातील प्रश्नावर असं दिलं उत्तर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील पराभवानंतर गौतम गंभीर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना खेळपट्टीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. जर आम्ही जिंकलो असतो तर कदाचित खेळपट्टीचा प्रश्नच तुम्ही विचारला नसता, असे म्हणत गंभीर यांनी खेळपट्टी योग्य होती असे सांगितले. ते म्हणाले की, खेळपट्टी अगदी आम्हाला हवी तशी होती. पीच क्युरेटरनं चांगल सहकार्य केले. खेळपट्टी फार कठीण नव्हती. बावुमा, वाशिंग्ट सुंदर आणि अक्षर पटेल यांनी धावा काढल्या. टर्निंग पिचवर ४० पैकी सर्वाधिक विकेट्स या सीमर्संनी मिळवल्या, असे म्हणत त्यांनी खेळपट्टीबद्दल कोणतीही तक्रार नाही, असे स्पष्ट सांगितले.
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
फलंदाज पराभवाला जबाबदार आहेत का?
कोलकाताची खेळपट्टी ही फलंदाजांची तांत्रिक कौशल्य आणि मानसिकता याची परीक्षा होती. फिरकीचा सामना करण्यासाठी फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे, असेही गौतम गंभीर यांनी म्हटले आहे. पण पराभवाला फलंदाज कारणीभूत आहेत, यावर मात्र त्यांनी हटके उत्तर दिले. संघाचा विजय किंवा पराभव हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे या पराभवाचं खापर कोणत्याही एका डिपार्टमेंटवर फोडण्यापेक्षा हा पराभव संपूर्ण संघाचा आहे, असे उत्तर त्यांनी दिले. गुवाहटीच्या मैदानात कमबॅक करू असा विश्वासही गंभीर यांनी व्यक्त केला आहे.
घरच्या मैदानातील ६ कसोटी सामन्यातील टीम इंडियाचा चौथा पराभव
भारतीय संघावर मागील ६ कसोटी सामन्यात घरच्या मैदानात चौथ्या पराभवाची नामुष्की ओढावली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका जिंकली. पण आता दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील फिरकीपटूने भारतीय फलंदाजांची गिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले.