IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)

नव्या वर्षातील नवा सामना अन् विराट-रोहितचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 20:12 IST2026-01-11T19:35:53+5:302026-01-11T20:12:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ 1st ODI Rohit Sharma And Virat Kohli’s Hilarious Closet Reveal Felicitation By BCA Video Goes Viral | IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)

IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)

Rohit Sharma And Virat Kohli Honored Creative Ceremony At New BCA Stadium in Vadodara : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन भारतीय दिग्गजांचा वडोदऱ्यातील नव्या कोटंबी स्टेडियममध्ये खास सन्मान करण्यात आला. पहिला डाव संपल्यानंतर हे दोन्ही दिग्गज खेळाडू एका खास कपाटातून बाहेर येताना दिसले. त्यानंतर त्यांचा विशेष पद्धतीने गौरव करण्यात आला. या खास  क्षणाचा व्हिडिओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नव्या वर्षातील नवा सामना अन् विराट-रोहितचा जलवा!


 
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसह भारतीय संघाने नव्या वर्षाची सुरुवात केली. रोहित आणि विराट फक्त वनडेत खेळत असल्यामुळे वडोदराच्या मैदानात दोघांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. वडोद्याच्या मैदानातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोघांचा अगदी अनोख्या अंदाजात सन्मान करण्यात आला. रोहित आणि विराट  एका कपाटातून बाहेर आले. या कपाटावर दोघांचे पोस्टर लावलेले होते. कपाटातून बाहेर आल्यावर दोघांनी त्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन दोघांंचा गौरव करण्यात आला.

IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी

Web Title : IND vs NZ: रोहित और विराट का अनोखा सम्मान; अलमारी से निकले!

Web Summary : IND vs NZ मैच के दौरान, वडोदरा के नए स्टेडियम में रोहित शर्मा और विराट कोहली को सम्मानित किया गया। वे एक अलमारी से निकले, उस पर हस्ताक्षर किए, और एक विशेष समारोह में गुलदस्ते प्राप्त किए। इस अनोखे पल का वीडियो वायरल हो रहा है।

Web Title : IND vs NZ: Rohit & Virat Honored Uniquely; Emerged from a Cupboard!

Web Summary : During the IND vs NZ match, Rohit Sharma and Virat Kohli were honored at Vadodara's new stadium. They emerged from a cupboard, signed it, and received bouquets in a special ceremony. A video of this unique moment is going viral.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.