ICC WTC Final: रिषभ पंतचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीनं केली गोलंदाजी, पाहा Video

ICC WTC Final: intra-squad match डन दौऱ्यासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघानं दोन गटात विभागणी करून सरावाला सुरुवात केली. एका संघात जगातील सर्वोत्तम फलंदाज, तर दुसऱ्या संघात सर्वोत्तम गोलंदाज असा हा सामना रंगला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 11:34 AM2021-06-13T11:34:29+5:302021-06-13T11:35:28+5:30

whatsapp join usJoin us
ICC WTC Final: Shubman Gill score 85, Rishabh Pant slams 121 off just 94 balls & Virat Kohli bowls in intra-squad match  | ICC WTC Final: रिषभ पंतचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीनं केली गोलंदाजी, पाहा Video

ICC WTC Final: रिषभ पंतचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीनं केली गोलंदाजी, पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC WTC Finals : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू आहे. न्यूझीलंडने यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून स्वतःला WTC Final साठी तयार केले असले तरी त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय खेळाडू समर्थ आहेत. लंडन दौऱ्यासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघानं दोन गटात विभागणी करून सरावाला सुरुवात केली. एका संघात जगातील सर्वोत्तम फलंदाज, तर दुसऱ्या संघात सर्वोत्तम गोलंदाज असा हा सामना रंगला.  

Photo : सहकाऱ्यांची मानवी ढाल, क्रीडा विश्वाच्या प्रार्थना अन् ख्रिस्टीयन एरिक्सेननं मृत्यूलाही दिला चकवा

बिनधास्त खेळीनं ओळखळ्या जाणाऱ्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) चौकार-षटकारांची आतषबाजी करताना 94 चेंडूंत 124 धावा कुटल्या. रोहित शर्मासोबत फायनलमध्ये सलामीसाठी शर्यतीत असलेल्या शुबमन गिलनंही ( Shubman Gill) फॉर्मात असल्याची प्रचिती दिली. त्यानेही 85 धावांची खेळी केली. यावेळी कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विराटनं गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी किवी संघाला बुचकळ्यात टाकले आहे. विराट नक्की कोणती रणनिती आखतोय, हेच किवींनी ओळखणे अवघड झाले आहे,

OMG : फॅफ ड्यू प्लेसिस हॉस्पिटलमध्ये, पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्यात झाला अपघात, Video

पाहा व्हिडीओ...


विराट कोहलीसमोर अंतिम 11 निवडण्याचा पेच

18 ते 23 जून या कालावधीत रंगणाऱ्या कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोणत्या 11 खेळाडूंना खेळवायचे, यासाठी विराट आतापासून विचार करत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, आर अश्विन, रवींद्र जडेजा ही नावं अंतिम 11मध्ये पक्की मानली जात आहेत. पण, उर्वरित दोन जागांसाठी 11 उमेदवारा आहेत आणि त्यातून छाननी करणे संघासाठी डोकेदुखी ठरू शकते.

WTC Final India’s Playing XI : कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; पण 20 पैकी अंतिम 11 मध्ये कोणाला मिळणार संधी?

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

Web Title: ICC WTC Final: Shubman Gill score 85, Rishabh Pant slams 121 off just 94 balls & Virat Kohli bowls in intra-squad match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.