WTC Final: Copy Paste क्लीन बोल्ड..!! चेतेश्वर पुजारालाही ऑस्ट्रेलियाने गिलसारखंच गंडवलं!

Cheteshwar Pujara, WTC Final 2023 IND vs AUS: पुजाराने बाहेर जाणारा चेंडू सोडला आणि तिथेच फसला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:17 PM2023-06-08T21:17:30+5:302023-06-08T21:18:12+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Copy Paste clean bowled of Cheteshwar Pujara like Shubman Gill | WTC Final: Copy Paste क्लीन बोल्ड..!! चेतेश्वर पुजारालाही ऑस्ट्रेलियाने गिलसारखंच गंडवलं!

WTC Final: Copy Paste क्लीन बोल्ड..!! चेतेश्वर पुजारालाही ऑस्ट्रेलियाने गिलसारखंच गंडवलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Cheteshwar Pujara Clean Bowled Wicket, ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 2: कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची अवस्था पहिल्याच डावात बिकट दिसली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पण दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केले. ऑस्ट्रेलियाला ४६९ धावांवर बाद केल्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे भारतीय सलामीवीर स्वस्तात बाद झाले. रोहितला पॅट कमिन्सने पायचीत केलं, तर गिलला स्कॉट बोलंडने त्रिफळाचीत केले. त्यानंतर पुजाराकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. पण त्याने साऱ्यांची साफ निराशा केली. शुबमन गिलच्या विकेटमधून काहीही बोध न घेतल्याने तो देखील तसाच बाद धाला.

४६९ धावांचे विशाल आव्हान पाहिल्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. पण या दोघांनी वेगळीच भूमिका घेतली. रोहित शर्माने सुरूवातीपासून हवेत पुल शॉट खेळायला सुरूवात केली तर शुबमन गिल देखील धावा करण्याच्या दृष्टीने खेळू लागला, पण त्यांना ऑस्ट्रेलियाने बरोबर अडकवले. कर्णधार रोहित हाफ पिच चेंडूवर २६ चेंडूत १५ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिल चेंडू सोडून देताना, स्विंगने त्याला वेडं बनवलं. स्कॉट बोलंडचा बाहेरचा चेंडू सोडताना चेंडू आत आला आणि त्याचा स्टंप उडवला. अगदी तसाच पुजारादेखील बाद झाला. पुजारा शांत व संयमीपणे खेळत होता. पण २५ चेंडूंवर १४ धावांवर खेळताना त्याने चेंडू सोडला आणि तो क्लीन बोल्ड झाला. पाहा व्हिडीओ-

पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे क्रीजवर आला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी आधी बरीच चांगली भागीदारी केली आहे. पण भारतीयांचे ते स्वप्नही पूर्ण होऊ शकले नाही. चेंडू अचानक उडला आणि विराटला तो खेळता आला नाही. त्यामुळे तो झेलबाद झाला. विराटने देखील १४ धावाच केल्या.

दरम्यान, त्याआधी ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला. डेव्हिड वॉर्नरने ४३ धावावर तर लाबूशेन २६ धावावर माघारी परतला. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड जोडीने २८५ धावांची भागीदारी केली. ट्रेव्हिस हेड १६३ धावा करून तर स्टीव्ह स्मिथ १२१ धावांवर तंबूत गेला. त्यानंतर अलेक्स कॅरीने ४८ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४६९ धावांपर्यंत मजल मारता आली.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 2 Copy Paste clean bowled of Cheteshwar Pujara like Shubman Gill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.