T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानला तुमचा अभिमान!; भारताला नमवल्यानंतर पंतप्रधान Imran Khan यांच्यासह अनेकांनी केलं कौतुक

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही फॉर्मात असलेली जोडी टीम इंडियावर भारी पडली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:39 PM2021-10-24T23:39:57+5:302021-10-24T23:46:39+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : The nation is proud of you all, Pak PM Imran Khan, Shoaib Akhtar and Shahid Afridi congratulate team | T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानला तुमचा अभिमान!; भारताला नमवल्यानंतर पंतप्रधान Imran Khan यांच्यासह अनेकांनी केलं कौतुक

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानला तुमचा अभिमान!; भारताला नमवल्यानंतर पंतप्रधान Imran Khan यांच्यासह अनेकांनी केलं कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयाची मालिका आज खंडित झाली. शाहिन शाह आफ्रिदीनं ( Shaheen Shah Afridi) दिलेल्या धक्क्यानंतर बाबर आजम ( Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान ( Mohammed Rizawan) यांनी दोघांनीच टीम इंडियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पाकिस्ताननं वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच टीम इंडियावर विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan) यांनी देशाला तुमचा अभिमान वाटतो, या शब्दात संघाचे कौतुक केले. 

शाहिन शाह आफ्रिदीनं आजच्या सामन्यात रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches

बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही फॉर्मात असलेली जोडी टीम इंडियावर भारी पडली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१२मध्ये डेव्हिड वॉर्नर व शेन वॉटसन यांनी १३३ धावांची भागीदारी केली होती. बाबर ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. रिझवान ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.Ind vs Pak live match, Ind vs Pak latest  score,   

पाहा कोण काय म्हणाले.. 
''पाकिस्तान संघाचे आणि विशेषतः बाबर आजमचे अभिनंदन. रिझवान व शाहिन आफ्रिदी यांचेही कौतुक. देशाला तुमचा अभिमान!.''असे इम्रान खान यांनी ट्विट केलं. 





 

Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : The nation is proud of you all, Pak PM Imran Khan, Shoaib Akhtar and Shahid Afridi congratulate team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.