ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर

ICC Rankings Abhishek Sharma Became New No 1 Batter In T20Is : ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडला मागे टाकत अभिषेक शर्मानं मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:15 IST2025-07-30T15:14:30+5:302025-07-30T15:15:06+5:30

whatsapp join usJoin us
ICC Rankings Abhishek Sharma Became New No 1 Batter In T20Is Ravindra Jadeja Retains Top Spot Among Test All Rounders | ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर

ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Rankings Abhishek Sharma Became New No 1 Batter In T20Is  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बुधावारी जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत भारतीय संघाचा सलामीवीर आणि स्फोटक बॅटर अभिषेक शर्मा टी-२० तील नवा किंग झालाय. त्याने ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेडला मागे टाकत अव्वलस्थानावर झेप घेतली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 T20I मध्ये नंबर वनचा ताज मिरवणारा तिसरा भारतीय बॅटर

२४ वर्षीय अभिषेक शर्मा किंग कोहली आणि भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यानंतर टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचणार तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या खात्यात आता ८२९ रेटिंग गुण जमा आहेत. ट्रॅविस हेड ८१४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

सामना संपला! पण ओव्हर काही संपता संपली नाही! पाक विरुद्धच्या लढतीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची फजिती

कसोटीत जड्डूचा नंबर वनवरील कब्जा आणखी भक्कम

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजाने अव्वल स्थानावरील आपला कब्जा आणखी भक्कम केला आहे. मँचेस्टर कसोटी सामन्यातील शतकी खेळी अन् चार बळींच्या जोरावर कसोटी सामन्यातील शतकी खेळीनंतर जड्डूच्या खात्यात ४२२ गुण जमा झाले आहेत. कसोटी क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजपेक्षा तो ११७ गुणांनी आघाडीवर आहे.

कसोटी क्रमवारीत वॉशिंग्टन सुंदरही फायद्यात
 
मँचेस्टर कसोटी सामन्यात सुंदर खेळीसह कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरनंही कसोटी क्रमवारीत आठ स्थानांनी सुधारणा केली आहे. मँचेस्टर कसोटी सामन्यात २ विकेट्स अन् नाबाद शतकी खेळीच्या जोरावर तो आता कसोटी क्रमवारीत ६५ व्या स्थानावर पोहचला आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत जो रुट नंबर वन; गोलंदाजीत बुमराहचा जलवा कायम

कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत जो रूट पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.  केन विल्यमसनपेक्षा ३७ अधिक रेटिंगसह तो नंबर वन ठरलाय.  इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने तीन स्थानांनी झेप घेत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. रूटने मँचेस्टर येथे इंग्लंडच्या एकमेव डावात १५० धावा केल्या तर स्टोक्सने पाच धावा केल्या आणि १४१ धावा केल्या. मँचेस्टर कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह फारसा प्रभावी दिसला नव्हता. पण त्याने क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखले आहे. गोलंदाजीमध्ये टॉप १० मध्ये तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.

 

Web Title: ICC Rankings Abhishek Sharma Became New No 1 Batter In T20Is Ravindra Jadeja Retains Top Spot Among Test All Rounders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.