हार्दिक पांड्याच्या गोड बातमीवर नताशाच्या Ex बॉयफ्रेंडनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

हार्दिक पांड्यानं रविवारी ही गुड न्यूज दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 16:16 IST2020-06-01T16:16:02+5:302020-06-01T16:16:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya announces fiancée Natasa Stankovic is pregnant, actress' ex-boyfriend Aly Goni reacts svg | हार्दिक पांड्याच्या गोड बातमीवर नताशाच्या Ex बॉयफ्रेंडनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

हार्दिक पांड्याच्या गोड बातमीवर नताशाच्या Ex बॉयफ्रेंडनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनणार आहे. त्यानं इंस्टाग्रामवरून ही गोड बातमी दिली. हार्दिकनं 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुबईत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसह साखरपुडा केला होता. त्यानंतर हे कपल सोबतच आहेत. लॉकडाऊनमुळे नताशा ही पांड्या कुटुंबीयांसोबतच राहत आहे. रविवारी हार्दिकनं नताशासोबतचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली. टीम इंडियाच्या सर्व सदस्यांनी हार्दिक-नताशाचे अभिनंदन केलं. हार्दिकनं दिलेल्या गोड बातमीवर नताशाच्या Ex बॉयफ्रेंडनेही प्रतिक्रिया दिली. 

हार्दिक-नताशा गेली अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. त्यांना अनेकवेळा एकत्रही पाहिले गेले. दोन महिन्यांपूर्वी हार्दिकनं मुंबईत झालेल्या एका पार्टीमध्ये भाऊ कृणालची नताशाशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रेमाचं अंकुर अजून फुललं... नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिकनं नताशासोबत साखरपुडा करून प्रेमाची कबुली दिली. हार्दिकनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत दोघंही एकमेकांना किस करताना दिसले होते.  

सर्बियन नागरिक असलेल्या नताशाने 'सत्याग्रह'सह अन्य काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस-8 या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या नच बलिये या कार्यक्रमात ती एक्स बॉयफ्रेंड एल. गोनीसोबत सहभाग घेतला होता. हार्दिकनं गोड बातमी दिल्यानंतर गोनीनंही प्रतिक्रिया दिली. त्यानं लिहिलं की,''तुम्हा दोघांना देवाकडून भरपूर आशीर्वाद मिळो...''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

WWE स्टार खेळाडूनं घेतला जगाचा निरोप; दोन महिन्यांपूर्वी झालेलं पत्नीच निधन 

नताशाच्या 'बेबी शॉवर'ला हार्दिक पांड्याची फुल्ल टू धमाल; फोटो व्हायरल 

हार्दिक-नताशा यांनी Good News दिली, विरुष्काची डोकेदुखी वाढली; पाहा भन्नाट मीम्स!

विराट कोहलीला घाबरत नाही; पाकिस्तानच्या 17 वर्षीय गोलंदाजानं दिलं चॅलेंज

Video : युवराज सिंगच्या 'किचन 100' चॅलेंजला सचिन तेंडुलकरचं दमदार उत्तर 

Shocking : भारताच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजाचे रस्ता अपघातात निधन 

लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी त्यानं चोरली बाईक; त्यानंतर जे केलं ते भारीच होतं!

Web Title: Hardik Pandya announces fiancée Natasa Stankovic is pregnant, actress' ex-boyfriend Aly Goni reacts svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.