भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर आज 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे पहिले फलंदाज, कसोटीच्या दोन्ही डावांत तीन वेळा शतक झळकावणारे पहिले फलंदाज, 2005पर्यंत सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम त्यांच्या नावावर होता आणि कसोटीत 100 झेल टिपणारे पहिले भारतीय क्षेत्ररक्षक आदी अनेक विक्रम नावावर असलेल्या लिटिल मास्टर गावस्कर यांनी वाढदिवशी ग्रेट काम केलं आहे. गावस्कर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 35 मुलांच्या हृदयावर होणाऱ्या शस्त्रक्रीयेचा खर्च उचलला आहे.
खारघर येथे लहान मुलांच्या हृदयविकारावर उपचार करणाऱ्या श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमधील 35 मुलांच्या शस्त्रक्रीयेचा खर्च गावस्कर उचलणार आहेत. शुक्रवारी त्यांनी हॉस्पिटलला भेट दिली आणि तेथे मुलांच्या कुटुंबीयांना हे आश्वासन दिलं. गेल्या वर्षीही त्यांनी अशीच मदत केली होती. गावस्कर यांनी भारताकडून 35 शतकं झळकावताना सर डॉन ब्रॅडमन यांचा शतकांचा विक्रम मोडला होता. त्यामुळे त्यांनी 35 मुलांच्या शस्त्रक्रीयेचा खर्च उचलला आहे.
''अशी अनेक कार्यक्षेत्र आहेत, ज्याकडे कोणी लक्ष देत नाही. मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर त्यांच्यामुळे हास्य फुलतं,''असे गावस्कर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. ते पुढे म्हणाले,''भारतात जन्मजात हृदयरोग हा समान आजार आहे. अनेकांना त्याचा खर्च परवडत नाही. तसेच त्यासाठीच्या सुविधाही मर्यादित आहेत. Heart to Heart Foundation अशा शेकडो मुलांना जीवनाची भेट देते.''
यापूर्वी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी गावस्कर यांनी 59 लाखांचे दान केले होते. त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत 35 लाख, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 24 लाख दिले आहेत. त्यांनी दान केलेल्या रकमेमागे एक गुपित आहे. गावस्कर यांनी टीम इंडियाक़डून 34 कसोट आणि 1 वन डे शतक झळकावलं आहे. म्हणून त्यांनी केंद्राला 35 लाखांची मदत केली. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 22 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2 शतकं अशी 24 शतकं झळकावली आहे. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला 24 लाखांची मदत केली.
Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!
टीम इंडियातील दोन खेळाडूंमध्ये झालेला वाद; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!