India Women Register Their First T20I Series Win On English Soil : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या मैदानात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. एका बाजूला क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात रंगणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेट संघाने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर इतिहास रचला आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यातील विजयासह टीम इंडियानं पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशी आपल्या नावे केलीये. इंग्लंडच्या मैदानातील भारतीय महिला संघाचा हा पहिला टी-२० मालिका विजय ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मँचेस्टरचं मैदान मारत टीम इंडियानं रचला इतिहास
भारत-इंग्लंड महिला टी-२० क्रिकेटचा पहिला आणि एकमेव टी-२० सामना हा २००६ मध्ये डर्बीच्या मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला. त्यानंतर दोन्ही देशांत ६ वेळा तीन-किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची द्विपक्षीय टी-२० मालिका खेळवण्यात आली. यात एकदाही भारतीय महिला संघाला मालिका जिंकता आली नव्हती. अखेर मँचस्टरचे मैदान मारत भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या मैदानात ऐतिहासिक मालिका विजयाचा डाव साधला आहे.
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
भारतीय महिला संघाने धावांचा यशस्वी पाठलाग करत जिंकली मालिका
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने दमदार कमबॅक करत मालिकेतील आव्हान कायम राखले होते. मँचेस्टरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघाला निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १२६ धावांवर रोखले. हे आव्हान टीम इंडियाने ३ षटके आणि ४ विकेट राखून पार करत सामन्यासह मालिकेवर ३-१ असा कब्जा केला.
गोलंदाजीत भारताकडून राधा यादवनं सोडली खास छाप
पहिल्यांदा फलंदाजीकरताना सोफिया डंकली आणि डॅनियल व्याट हॉज या जोडीनं इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. पण भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंड महिला बॅटरचा निभावच लागला नाही. ने की। भारतीय स्पिनर के शानदार प्रदर्शन का सामना इंग्लैंड की टीम नहीं कर सकी और किसी भी खिलाड़ी ने बड़ा स्कोर नहीं बनाया। डंकलीने २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने संघाकडून सर्वाधिक २२ धावांची खेळी केली. तिच्याशिवाय कर्णधार टॅमसिन ब्यूमॉन्ट हिने १९ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. भारताकडून राधा यादव आणि नल्लापुरेड्डी श्री चरणी या दोघींनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. अमनजोत कौर आणि दीप्तीनं प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
स्मृती, शेफाली अन् हरमनप्रीतसह बॅटिंगमध्ये जेमिमा रॉड्रिग्सनं दाखवली धमक
इंग्लंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची उप कर्णधार स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी डावाची सुरुवात केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीादारी रचली. शेफाली १९ चेंडूत ३१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतली. स्मृती मानधनानं ३१ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौर २६ (२५) आणि अमनजोत कौर २(२) धावा करून माघारी फिरल्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जनं रिचा घोषच्या साथीनं संघाचा विजय निश्चित केला. जेमिमाा २२ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने २४ धावांवर नाबाद राहिली. रिचानं ४ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ७ धावांची नाबाद खेळी केली.
Web Title: ENG W vs IND W 4th T20I History Has Been Created At Manchester As India Women Register Their First T20I Series Win On English Soil
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.