DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

DC vs KXIP: IPL आणि वाद हे समिकरण जणू घट्टच आहे. IPL 2020च्या दुसऱ्याच सामन्याने वादाला तोंड फोडले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: September 21, 2020 03:22 PM2020-09-21T15:22:34+5:302020-09-21T15:25:13+5:30

whatsapp join usJoin us
DC vs KXIP: KXIP co-owner Preity Zinta reacts after dubious short run call denies KL Rahul & Co. victory against DC | DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

DC vs KXIP : ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमार्कस स्टॉयनिसनं फलंदाजी आणि गोलंदाजीत दाखवली कमाल, एकहाती फिरवला सामनासुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडाच्या भेदक माऱ्यानं KXIPची उडवली दैनाDC vs KXIPच्या सामन्यात नव्या वादाला मात्र फुटले तोंड

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा ( Super Over ) थरार अनुभवायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात आज झालेल्या सामन्यात चाहत्यांना नाट्यमय निकाल पाहायला मिळाला. पण, या सामन्यातून एका नव्या वादाला ( Controversy )  तोंड फुटले आहे. अम्पायरच्या एका चुकीमुळे KXIPचा विजय हिरावला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) आणि इरफान पठाण ( Irfan Pathan) यांनी सामन्यानंतर ती चूक लक्षात आणून दिली. त्यात आता KXIPची सह मालक व बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिनंही तीव्र शब्दात नाराजी प्रकट करून BCCIकडे एक मागणी केली आहे. ( IPL 2020 Live Updates, Click here)  

अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका; वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!

157 धावांचा पाठलाग करताना KXIPचे फलंदाज झटपट माघारी परतले, परंतु मायंक अग्रवालनं ( Mayank Agarwal) तुफानी फटकेबाजी करून सामन्यातील चुरस कायम ठेवली. अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिसनं ( Marcus Stoinis) दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत KXIPला 8 बाद 157 धावांवर रोखले. विजयासाठी 2 चेंडूंत एक धाव हवी असताना मयांक सीमारेषेवर झेलबाद झाला. 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात DCने बाजी मारली.  

Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण

अम्पायरच्या चुकीचा निर्णय कितव्या षटकात?
19व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मयांक आणि ख्रिस जॉर्डन यांनी तीन धावा पळून काढल्या. पण, पंचांनी एक धाव शॉर्ट असल्याचे जाहीर केले. पण, ती धान शॉर्ट नसल्याचा अनेकांनी दावा केल्या. सेहवागनं तर टीका करताना मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार अम्पायरला द्या, असा खोचक टोमणा हाणला. 

प्रिती झिंटा काय म्हणते?
''मी मोठ्या उत्साहानं येथे दाखल झाले, सहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहिले आणि 5 वेळा आनंदानं कोरोना चाचणी करून घेतली. पण, त्या एका शॉर्ट धावेनं मला खुप दुःख पोहोचवले. जर तंत्रज्ञानाचा वापरच केला जाणार नसेल, मग त्याचा काय अर्थ? BCCI नं नवा नियम आणण्याची हीच वेळ आहे. दरवर्षी असं होता कामा नये,''असे ट्विट तिनं केलं.  


KXIP vs DC सामन्यातील टर्निंग पॉइंट
प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला ( DC) 157 धावा करता आल्या. मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) सुरुवातीला धक्के देत दिल्लीची अवस्था 3 बाद 13 अशी केली.  त्यानंतर श्रेयस अय्यर ( 39), रिषभ पंत ( 31) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. ही दोघं माघारी परतल्यानंतर दिल्लीची पुन्हा घसरगुंडी झाली. मार्कस स्टॉयनिसनं ( Marcus Stoinis) अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून संघाला 8 बाद 157 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानं ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या 20 व्या षटकात 30 धावा चोपल्या. स्टॉयनिसनं 21 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 53 धावांची खेळी केली. IPL 2020 Live Updates, Click here

KL Rahul आणि मयांक अग्रवाल KXIPसाठी सलामीला आले. राहुलनं फटकेबाजी करून 21 धावा केल्या, परंतु मोहित शर्माच्या सुरेख चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आर अश्विननं ( Ashwin) एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले. कृष्णप्पा गोवथम आणि मयांक यांनी सहाव्या विकेटसाठी साजेशी भागीदारी केली. 16व्या षटकात कागिसो रबाडानं ही जोडी तोडली. गोवथम 20 धावांवर माघारी परतला. मयांकनं एका बाजूनं संयमी खेळी करताना वैयक्तिक अर्धशतकासह पंजाबच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या.  मयांकने 60 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारासह 89 धावा केल्या.  विजयासाठी 2 चेंडूंत एक धाव हवी असताना मयांक सीमारेषेवर झेलबाद झाला. 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही. IPL 2020 Live Updates, Click here

अन्य म्हत्त्वाच्या बातम्या 

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार 

नशीब! मॅक्क्युलमला बॉलिंग करावी लागणार नाही; सांगतोय सर्वात महागडा बॉलर  

सुपरओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद

 

Web Title: DC vs KXIP: KXIP co-owner Preity Zinta reacts after dubious short run call denies KL Rahul & Co. victory against DC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.