DC vs KXIP Latest News : Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण

DC vs KXIP Latest News : 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात DCने बाजी मारली.  

By स्वदेश घाणेकर | Published: September 21, 2020 08:00 AM2020-09-21T08:00:00+5:302020-09-21T08:00:06+5:30

whatsapp join usJoin us
DC vs KXIP Latest News: DC's Kagiso Rabada bowled just three balls in Super Over, find out reason | DC vs KXIP Latest News : Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण

DC vs KXIP Latest News : Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील दुसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा ( Super Over ) थरार अनुभवायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात आज झालेल्या सामन्यात चाहत्यांना नाट्यमय निकाल पाहायला मिळाला. पण, कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) सुपर ओव्हरमध्ये तीनच चेंडू का टाकली? KXIPला केवळ तीनच चेंडूंची Super Over का? IPL 2020 Live Updates, Click here

157 धावांचा पाठलाग करताना KXIPचे फलंदाज झटपट माघारी परतले, परंतु मायंक अग्रवालनं ( Mayank Agarwal) तुफानी फटकेबाजी करून सामन्यातील चुरस कायम ठेवली. अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिसनं ( Marcus Stoinis) दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत KXIPला 8 बाद 157 धावांवर रोखले. विजयासाठी 2 चेंडूंत एक धाव हवी असताना मयांक सीमारेषेवर झेलबाद झाला. 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यात DCने बाजी मारली.  IPL 2020 Live Updates, Click here

प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात साजेशी झाली नाही. मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) सुरुवातीला धक्के देत दिल्लीची अवस्था 3 बाद 13 अशी केली.  त्यानंतर श्रेयस अय्यर ( 39), रिषभ पंत ( 31) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला. ही दोघं माघारी परतल्यानंतर दिल्लीची पुन्हा घसरगुंडी झाली. मार्कस स्टॉयनिसनं ( Marcus Stoinis) अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करून संघाला 8 बाद 157 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानं ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या 20 व्या षटकात 30 धावा चोपल्या. स्टॉयनिसनं 21 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 53 धावांची खेळी केली.IPL 2020 Live Updates, Click here

KL Rahul आणि मयांक अग्रवाल KXIPसाठी सलामीला आले. राहुलनं फटकेबाजी करून 21 धावा केल्या, परंतु मोहित शर्माच्या सुरेख चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आर अश्विननं ( Ashwin) एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले. कृष्णप्पा गोवथम आणि मयांक यांनी सहाव्या विकेटसाठी साजेशी भागीदारी केली. 16व्या षटकात कागिसो रबाडानं ही जोडी तोडली. गोवथम 20 धावांवर माघारी परतला. मयांकनं एका बाजूनं संयमी खेळी करताना वैयक्तिक अर्धशतकासह पंजाबच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या.IPL 2020 Live Updates, Click here 

मोहित शर्मानं टाकलेल्या 18 व्या षटकात 17 धावा चोपल्या. मयांकची ही फटकेबाजी 19व्या षटकातही कायम राहिली. 6 चेंडूंत 13 धावांची गरज असताना मयांकनं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. मयांकने 60 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारासह 89 धावा केल्या.  विजयासाठी 2 चेंडूंत एक धाव हवी असताना मयांक सीमारेषेवर झेलबाद झाला. 1 धाव 1 चेंडू असताना पंजाबला विजय मिळवता आला नाही. IPL 2020 Live Updates, Click here

अखेरच्या षटकातील थरार... पाहा व्हिडीओ...

सुपर ओव्हरचा थरार

  • कागिसो रबाडाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश राहुलच्या दोन धावा
  • दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल बाद
  • तिसऱ्या चेंडूवर निकोलस पूरण बाद
  • दोन विकेट्स गेल्यानं दिल्लीसमोर विजयासाठी 3 धावा
  • मोहम्मद शमीचा पहिला चेंडू निर्धाव
  • शमीच्या दुसरा चेंडू Wide
  • रिषभ पंतच्या दोन धावा

पाहा व्हिडीओ...

नियम काय सांगतो?
सुपर ओव्हरमध्ये एखाद्या संघाचे दोन विकेट गेल्यास ते षटक तेथेच समाप्त होते. लोकेश राहुलनं पहिल्या चेंडूवर दोन धाव घेतल्यानंतर कागिसो रबाडानं पुढील दोन चेंडूंवर राहुल आणि निकोलस पुरन यांना बाद केले. त्यामुळे ती सुपर ओव्हर तीन चेंडूंतच संपुष्टात आली आणि DCसमोर 3 धावांचे लक्ष्य ठेवले गेले.

Web Title: DC vs KXIP Latest News: DC's Kagiso Rabada bowled just three balls in Super Over, find out reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.