Cricketer Harbhajan singh will be seen acting on the film screen the film teaser was released | क्रिकेटच्या पीचनंतर आता चित्रपटात अ‍ॅक्शन स्टंट करताना दिसणार हरभजन, चित्रपटाचं टिझर रिलीज

क्रिकेटच्या पीचनंतर आता चित्रपटात अ‍ॅक्शन स्टंट करताना दिसणार हरभजन, चित्रपटाचं टिझर रिलीज

ठळक मुद्देभारतीय क्रिकेट संघातील ऑफ स्पिनर हरभजन सिंग आता चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. हरभजन सिंगच्या ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचे टीझर आज (सोमवारी) रिलीज झालेहरभजन सिंगने 2013 मध्येच पंजाबी चित्रपटात डेब्यू केले आहे. 

भारतीय क्रिकेट संघातील ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan singh) आता चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. तो सध्या त्याच्या येणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हरभजन सिंगच्या ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचे टीझर आज (सोमवारी) रिलीज झाले असून याला चाहत्यांचीही मोठी पंसंती मिळत आहे. (Cricketer Harbhajan singh will be seen acting on the film screen the film teaser was released)

टीझरमध्ये हरभजन सिंग शिवाय, वेगवेगळे पात्र बघायला मिळत आहेत. यात हरभजन कधी फाईट, कधी डान्स तर कधी जबरदस्त अ‍ॅक्टींग करताना दिसत आहे. तो या चित्रपटाच्या एका सीनमध्ये क्रिकेटचा चेंडू पकडतानाही दिसत आहे. हरभजन सिंगचा हा चित्रपट साउथमध्ये तयार झाला असून तो लवकरच हिंदीतही डब होणार आहे.

‘फ्रेंडशिप’ चित्रपट याच वर्षी रिलीज करण्यात येणार आहे. यापूर्वी हरभजन सिंगने 2013 मध्येच पंजाबी चित्रपटात डेब्यू केले आहे. हरभजन सिंगने पंजाबी चित्रपटात एका पोलीस कर्मचाऱ्याचा अभिनय केला आहे. या चित्रपटाला चाहत्यांचीही मोठी पसंती मिळाली होती. 

हरभजन अनेक वेळा टीव्ही शोतही दिसून आला आहे. हरभजनला क्रिकेटशिवाय चित्रपटातही अभिनय करायला आवडते. मात्र, हरभजनचा हा येणारा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरतो, की नाही हे पाहण्यासारखे असेल. 

हरभजन सिंगने 17 एप्रिल 1998 रोजी आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यावेळी तो केवळ 18 वर्षांचा होता. त्याचे क्रिकेट करिअर अत्यंच चांगले राहिले आहे. त्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर भारताला अनेक सामनेही जिंकूण दिले आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cricketer Harbhajan singh will be seen acting on the film screen the film teaser was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.