coronavirus : भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा क्रिकेटपटू कोरोनाविरोधात करतोय जनजागृती 

देशाला विश्वचषक जिंकून देणारा भारताचा माजी क्रिकेटपटू कोरोनाविरोधात रस्त्यावर उतरला असून, खाकी वर्दी परिधान करून रस्त्यावर उतरत तो लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 09:35 AM2020-03-29T09:35:32+5:302020-03-29T09:48:22+5:30

whatsapp join usJoin us
coronavirus: jogindar sharma awear people about corona virus BKP | coronavirus : भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा क्रिकेटपटू कोरोनाविरोधात करतोय जनजागृती 

coronavirus : भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा क्रिकेटपटू कोरोनाविरोधात करतोय जनजागृती 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा देशात होणारा फैलाव रोखण्यासाठी सरकार आणि इतर संस्थांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, देशाला विश्वचषक जिंकून देणारा आणि सध्या पोलीस सेवेत असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू कोरोनाविरोधात रस्त्यावर उतरला आहे. खाकी वर्दी परिधान करून रस्त्यावर उतरत हा क्रिकेटपटू लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही सूचना करत आहे. 

या क्रिकेटपटूचे नाव आहे जोगिंदर शर्मा. त्याने 2007 साली झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीत जोगिंदर शर्माने भारताला रोमांचक विजय मिळवून दिला होता. जोगिंदर शर्मा सध्या हरियाणा पोलीस दलात डीएसपी आहे. तो हिसार शहरात तैनात आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21  दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.  दरम्यान,  जोगिंदर शर्मा आपल्या कार्यक्षेत्रात जातीने दक्षता घेत आहे. तो खाकी वर्दी परिधान करून रस्त्यावर उतरत हा क्रिकेटपटू लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही सूचना देत आहे. जोगिंदर शर्माच्या या कार्याची दाखल आयसीसीने देखील घेतली आहे. आयसीसीने त्याच्या फोटोंचा कोलाज प्रसिद्ध करून त्याखाली ''2007 : विश्वचषकाचा हिरो, 2020 : जगातील खरा हिरो'' अशा ओळी लिहून त्याचे कौतुक केले आहे. 

2007 साली झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीत जोगिंदर शर्माने भारताला रोमांचक विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानविरोधात झालेल्या अटीतटीच्या लढतीत जोगिंदर शर्माने मिसबाह उल हकची विकेट काढत भारताला जिंकवले होते.

Web Title: coronavirus: jogindar sharma awear people about corona virus BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.