कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पोलीस आणि डॉक्टर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रपोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी सोशल मीडियाच्या DP वर महाराष्ट्रपोलिसांचे प्रतीक चिन्ह वापरावे असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. त्याला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं प्रतिसाद दिला. त्यानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटचा DP बदलला.
सचिननं ट्विट केलं की,''महाराष्ट्र पोलिसांचे मनापासून आभार. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस चोविसतास काम करत आहेत. जय हिंद.'' याआधी तेंडुलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 25 लाखांची मदत केली.
''उद्योग, खेळ, मनोरंजन इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच समाजातील सर्व घटकांनी माझ्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन, महाराष्ट्र पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो,''असा संदेश अनिल देशमुख यांनी पोस्ट केला.
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मदत करणाऱ्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलिसांनाही मदत केली आहे. या दोघांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत केली.
धक्कादायक : 89 चेंडूंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूवर सहा वर्षांची बंदी
वीरेंद्र सेहवाग खोटारडा; Shoaib Akhtar चा धक्कादायक दावा!