Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ( IPL 2021) आजपासून सुरूवात होत आहे. अवघ्या काही तासांत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai) यांच्यातल्या उद्धाटनीय सामन्याला सुरूवात होईल. पण, चर्चा सुरू झालीय ती महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings)... आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी CSKचा प्रमुख गोलंदाज जोश हेझलवूड ( Josh Hazelwood) यानं बायो-बबलला कंटाळून आयपीएलमधून माघार घेतली. त्यात दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुंगी एनगिडी ( Lungi Ngidi) क्वारंटाईनमध्ये आहे. अशात CSKकडे अनुभवी गोलंदाज नव्हता, परंतु शुक्रवारी त्यांनी ही उणीव भरून काढली.
CSKनं ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ ( Jason Behrendorff) याला हेझलवूडचा रिप्लेसमेंट म्हणून करारबद्ध केलं आहे. बेहरनडॉर्फ यानं ११ वन डे व ७ ट्वेंटी-२० सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो २०१९च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians) खेळला होता. पाच सामन्यांत त्याच्या नावावर पाच विकेट्स आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. MI vs RCB, Match Preview: कोहलीसमोर मुंबईचं 'विराट' आव्हान; कोण जिंकणार?
नुकत्याच पार पडलेल्या मार्श कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बेहरेनडॉर्फनं ६ षटकांत ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कारही पटकावला होता. पण, बेहरनडॉर्फ पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. त्याला ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. लुंगी एनगिडीही पहिल्या सामन्यात खेळणार नाही.
चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरि निशांत, जेसन बेहरनडॉर्फ.
चेन्नई सुपर किंग्सचे वेळापत्रक
१० एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
१६ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
१९ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
२१ एप्रिल, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
२५ एप्रिल, ३.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
२८ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली
१ मे, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
५ मे, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
७ मे, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
९ मे, ३.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
१२ मे, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
१६ मे, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
२१ मे, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
२३ मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता