ipl 2021 MI vs RCB Match Preview royal challengers bangalore ready to face mumbai indians | MI vs RCB, Match Preview: कोहलीसमोर मुंबईचं 'विराट' आव्हान; कोण जिंकणार?

MI vs RCB, Match Preview: कोहलीसमोर मुंबईचं 'विराट' आव्हान; कोण जिंकणार?

MI vs RCB, IPL 2021, Match Preview: कोरोनाचं सावट असलं तरी क्रिकेट चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आयपीएलचं १४ वं सीझन उद्यापासून सुरू होतंय. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा पहिलाच सामना दोन जबरदस्त संघांमध्ये होतोय. एका बाजूला आहे आयपीएलच्या जेतेपदावर सर्वाधिक वेळा अधिराज्य गाजवलेला मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians) तर दुसरीकडे मातब्बर आणि धडाकेबाज खेळाडूंचा भरणा असलेला कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ (royal challengers bangalore) 

३२ सिक्सर अन् १९२ धावा ठोकणाऱ्या पोलार्डला कसा रोखणार कोहली? पोलार्डची जोरदार तयारी, पाहा Video

चेन्नईच्या एम.ए.चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसमोर पहिल्या सामन्यासाठी काही अडचणी देखील आहेत. बंगळुरुच्या संघात देवदत्त पडीक्कल आणि डॅनियल सॅम यांना कोरोनाची लागण झाली. यात देवदत्त पुन्हा मैदानात परतला आहे. तर डॅनियल सॅम अद्याप क्वारंटाइन आहे. अॅडम झम्पा देखील पहिल्या सामन्यात खेळणार नाहीय. (IPL 2021: MI vs RCB: Match 1, Match Prediction)

उसेन बोल्टनं RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला दिला खास संदेश, म्हणाला...

दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघात क्वारंटाइनच्या नियमांमुळे दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झालेला क्विंटन डी कॉक पहिला सामना खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. पण मुंबईचा संघ एक खेळाडू संघात नसला तरी त्यांच्याकडे पर्यायी खेळाडू तयार आहेत. त्यात स्पर्धेचं पाचवेळा जेतेपद पटकावणारा संघ असल्याचं विसरुन चालणार नाही. त्यामुळे आकडेवारी पाहता मुंबईचं पारडं पहिल्या सामन्यात जड वाटत आहे. 

Match: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)
Venue: एम.ए.चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai)
Time: उद्या रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी
Where to watch live: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, हॉटस्टार

संघ

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
Rohit Sharma (C), Chris Lynn, Suryakumar Yadav, Ishan Kishan (wk), Kieron Pollard, Hardik Pandya, Krunal Pandya, Nathan Coulter Nile/Piyush Chawla, Rahul Chahar, Trent Boult, Jasprit Bumrah

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore)
Devdutt Padikkal, Virat Kohli (C), AB de Villiers (wk), Glenn Maxwell, Rajat Patidar/Mohammad Azharuddeen, Sachin Baby/Suyash Prabhudessai, Daniel Christian, Washington Sundar, Mohammed Siraj, Yuzvendra Chahal, Kyle Jamieson/Kane Richardson
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ipl 2021 MI vs RCB Match Preview royal challengers bangalore ready to face mumbai indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.