वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 09:00 AM2019-06-04T09:00:49+5:302019-06-04T09:01:36+5:30

whatsapp join usJoin us
BCCI announces Team India's home season schedule for 2019-20 | वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर

वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी 2019-20च्या हंगामातील घरच्या मैदानावरील मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार भारतीय संघ घरच्या मैदानावर 5 कसोटी, 9 वन डे आणि 12 ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. आगामी 2020 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयनं झटपट क्रिकेट सामन्यांना प्राधान्य दिले आहे.

या हंगामाची सुरुवात फ्रिडम चषक गांधी-मंडेला मालिकेनं होणार आहे. 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन ट्वेंटी-20 व तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन ट्वेंटी-20 व 2 कसोटी सामने खेळेल. 

वेस्ट इंडिजचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी डिसेंबरला भारतात येणार आहे. त्यानंतर मेन इन ब्लू झिम्बाब्वेविरुद्ध तीन ट्वेंटी-20 सामने खेळतील. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. दक्षिण आफ्रिका पुन्हा भारत दौऱ्यावर येणार आहे.

  • असे आहे वेळापत्रक 2019-2020

फ्रिडम चषक -2019 (वि. दक्षिण आफ्रिका)
15 सप्टेंबर - पहिली ट्वेंटी-20, धर्मशाला
18 सप्टेंबर - दुसरी ट्वेंटी-20, मोहाली
22 सप्टेंबर - तिसरी ट्वेंटी-20, बंगळुरू 
2 ते 6 ऑक्टोबर - पहिली कसोटी, विशाखापट्टणम
10 ते 14 ऑक्टोबर - दुसरी कसोटी, रांची
19 ते 23 ऑक्टोबर - तिसरी कसोटी, पुणे

बांगलादेशचा भारत दौरा
3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20, दिल्ली
7 नोव्हेंबर - दुसरी ट्वेंटी-20, राजकोट
10 नोव्हेंबर - तिसरी ट्वेंटी-20, नागपूर
14 ते 18 नोव्हेंबर- पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेबर - दुसरी कसोटी, कोलकाता
 

वेस्ट इंडिजचा भारत दौरा
6 डिसेंबर - पहिली ट्वेंटी-20, मुंबई
8 डिसेंबर - दुसरी ट्वेंटी-20, तिरुवनंतपुरम 
11 डिसेंबर - तिसरी ट्वेंटी-20, हैदराबाद
15 डिसेंबर - पहिली वन डे, चेन्नई
18 डिसेंबर - दुसरी वन डे, विशाखापट्टणम
22 डिसेंबर - तिसरी वन डे, कटक 

झिम्बाब्वेचा भारत दौरा - 2020
5 जानेवारी - पहिली ट्वेंटी-20, गुवाहाटी
7 जानेवारी - दुसरी ट्वेंटी-20, इंदूर
10 जानेवारी - तिसरी ट्वेंटी-20, पुणे


 
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा - 2020
14 जानेवारी - पहिली वन डे, मुंबई
17 जानेवारी - दुसरी वन डे, राजकोट
19 जानेवारी - तिसरी वन डे, बंगळुरू 
 


दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा - 2020
12 मार्च - पहिली वन डे, धर्मशाला
15 मार्च - दुसरी वन डे, लखनऊ
18 मार्च - तिसरी वन डे, कोलकाता 

Web Title: BCCI announces Team India's home season schedule for 2019-20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.