Team India's Squad For 5 Match T20I Series Against South Africa : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान बीसीसीआयने घरच्या मैदानातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या १५ सदस्यीय संघात हार्दिक पांड्यासह उप कर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करत आहेत. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघात ९ डिसेंबरपासून टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. १९ डिसेंबरला या द्विपक्षीय मालिकेची सांगता होणार आहे.
हार्दिक पांड्या अन् गिलचं कमबॅक; रिंकूसह नितीश कुमार रेड्डीचा पत्ता कट
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वपूर्ण असेल. एका बाजूला शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरुन पुन्हा संघात परतले आहेत. याशिवाय कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराहही टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे काही खेळाडूंचा पत्ता कट झाला आहे. यात फिनिशरच्या रुपात टीम इंडियाचा भाग असलेल्या रिंकू सिंह याच्यासह अष्टपालू नितीश कुमार रेड्डीचा समावेश आहे. या दोघांनाही संघात स्थान मिळालेले नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.
भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्याचे वेळापत्रक
- भारत विरुद्ध विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना, ९ डिसेंबर (बाराबती स्टेडियम, कटक)
- भारत विरुद्ध विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी-२० सामना, ११ डिसेंबर (मुल्लनपूर, न्यू चंदीगड)
- भारत विरुद्ध विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना, १४ डिसेंबर (धरमशाला, हिमाचल प्रदेश)
- भारत विरुद्ध विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना, १७ डिसेंबर (एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ)
- भारत विरुद्ध विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना, १९ डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)