Rohit Sharma Virat Kohli, Team India Schedule: भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन स्टार खेळाडूंच्याशिवाय टीम इंडिया पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. विराट आणि रोहित दोघांनीही टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यातच IPL चा हंगामही संपला आहे. त्यामुळे आता हे दोघे पुन्हा क्रिकेटच्या मैदानात केवळ वनडे सामन्यांसाठीच खेळताना दिसणार आहेत. यंदाच्या वर्षात हे दोघे ऑगस्टपासून काही वनडे मालिकांमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यासोबतच नवीन वर्षात हे दोघे कधी खेळताना दिसणार आहेत, याची बीसीसीआयने माहिती दिली आहे.
BCCI ने नवीन वर्षात होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी द्विपक्षीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही मालिका जानेवारी २०२६ मध्ये भारतात होणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात तीन वन-डे आणि पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामने (T20I) असतील. ही मालिका ११ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान भारतातील आयोजित केली जाईल.
- ११ जानेवारी - रविवार दुपारी १:३० - पहिला एकदिवसीय सामना - बडोदा
- १४ जानेवारी - बुधवार दुपारी १:३० - दुसरा एकदिवसीय सामना - राजकोट
- १८ जानेवारी - रविवार दुपारी १:३० - तिसरा एकदिवसीय सामना - इंदूर
- २१ जानेवारी - बुधवार संध्याकाळी ७:०० - पहिला टी२० सामना - नागपूर
- २३ जानेवारी - शुक्रवार संध्याकाळी ७:०० - दुसरा टी२० सामना - रायपूर
- २५ जानेवारी - रविवार संध्याकाळी ७:०० - तिसरा टी२० सामना - गुवाहाटी
- २८ जानेवारी - बुधवार संध्याकाळी ७:०० - चौथा टी२० सामना - विशाखापट्टणम
- ३१ जानेवारी - शनिवार संध्याकाळी ७:०० - पाचवा टी२० सामना - त्रिवेंद्रम
कर्णधार कोण?
भारत टी२० मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. तर वनडे मालिकेत रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडेल. याआधी भारत आणि न्यूझीलंड अलीकडेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते. त्यामध्ये भारताने विजय मिळवला आणि १२ वर्षांनी जेतेपद जिंकले.
Web Title: bcci announced next year india vs new zealand schedule odi t20 matches rohit sharma virat kohli in action Ind vs nz
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.