रेचेल हेन्स अन् बाबर आझम संदर्भातील ती खास पोस्ट; जे लिहिलंय ते न पटण्याजोगे! कारण...

बिग बॅशच्या १५ व्या हंगामासाठी तो सिडनी सिक्सर्सच्या संघासोबत करारबद्ध झालाय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 21:15 IST2025-06-13T21:11:35+5:302025-06-13T21:15:16+5:30

whatsapp join usJoin us
Babar Azam Signs For Sydney Sixers For Upcoming Big Bash League BBL Season Rachael Haynes Share Special Welcome Words For Pakistan Batter | रेचेल हेन्स अन् बाबर आझम संदर्भातील ती खास पोस्ट; जे लिहिलंय ते न पटण्याजोगे! कारण...

रेचेल हेन्स अन् बाबर आझम संदर्भातील ती खास पोस्ट; जे लिहिलंय ते न पटण्याजोगे! कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याला पाकिस्तानच्या टी-२० संघात जागा मिळणं कठीण झालं आहे. PCB नं त्याला ठेंगा दाखवला असताना आता त्याने ऑस्ट्रेलियाचा रस्ता धरला आहे. बाबर आझम आता ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. बिग बॅशच्या १५ व्या हंगामासाठी तो सिडनी सिक्सर्सच्या संघासोबत करारबद्ध झालाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रेचेल हेन्स अन् बाबर आझमसंदर्भातील ती खास पोस्ट

सिडनी सिक्सर्सच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन बाबर आझम हा संघाचा भाग झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटर आणि सिडनी सिक्सर्स फ्रँचायझी संघाची GM रेचेल हेन्स हिने पाकिस्तान बॅटरचे खास अंदाजात स्वागत केल्याचे दिसते. रेचेल हेन्स हिने ५६ क्रमांकाची बाबर आझमची जर्सी दाखवत जगातील सर्वोत्तम बॅटर पैकी एक आमच्या ताफ्यात अशी भावना व्यक्त केली आहे.

WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?

फॉर्म हरवलाय अन्टी पाक संघातही मिळेना जागा, मग...

बाबर आझम याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात ही अगदी धमाक्यात केली होती. पण मागील काही वर्षांपासून तो सातत्याने अपयशी ठरताना पाहायला मिळाले आहे. सध्याच्या घडीला तर पाकिस्तानच्या टी-२० संघातही त्याला जागा मिळेना. मग तो भारी कसला असा प्रश्न त्याच्या स्वागतासाठी शेअर केलेल्या पोस्टमधील बाबरसंदर्भात लिहिलेल्या त्या ओळी वाचल्यावर पडू शकतो. 

बाबर शिवाय हे पाकिस्तानी खेळाडूही उतरणार मैदानात

ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग स्पर्धेचा भाग झाल्यावर बाबर आझम यानेही खास प्रतिक्रिया दिली आहे. जगातील सर्वात्तम टी-२० लीगमध्ये सहभागी झाल्याचा आनंद आहे. या लीगमधील सर्वात यशस्वी संघासाठी सर्वोत्तम देऊन, अशा आशयाचे वक्तव्य बाबर आझमनं केले आहे. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये शादाब खान, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस राउफ ही मंडळी देखील खेळताना दिसणार आहे. 

 

Web Title: Babar Azam Signs For Sydney Sixers For Upcoming Big Bash League BBL Season Rachael Haynes Share Special Welcome Words For Pakistan Batter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.