ट्वेंटी-२० क्रिकेट अधिक रंजक बनवण्यासाठी इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन ( Kevin Pietersen) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC) मागणी केली आहे. त्यानं तसा प्रस्ताव आयसीसीसमोर ठेवला असून या नियमाची अंमलबजावणी आयपीएलमध्येही करण्यात यावी, असं ट्विट केलं. फलंदाजानं मारलेला षटकार १०० मीटरपेक्षा लांब गेल्यास खेळाडूला १२ धावा देण्यात याव्या, अशी मागणी केपीनं केली आहे.
त्यानं ट्विट केलं की,''एखाद्या खेळाडूनं टोलावलेला चेंडू १०० मीटरपेक्षा लाब केल्यास, त्या खेळाडूला दुप्पट म्हणजेच १२ धावा देण्यात याव्या. याची अंमलबजावणी दी हंड्रेड मध्येही केली जावी, असेही तो म्हणाला.
केपीनं
इंग्लंडकडून १०४ कसोटी, १३६ वन डे व ३७ ट्वेंटी-२० सामने खेळून त्यात १३ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत आणि त्यात ३२ आंतरराष्ट्रीय शतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला हा खेळाडू २०१०च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाचा सदस्य होता.