मतदानाच्या दिवशी भरणार नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजार
By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 2, 2024 17:27 IST2024-05-02T17:27:10+5:302024-05-02T17:27:25+5:30
सोमवारी १३ मेला लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने त्या दिवशी जिल्ह्यातील १० आठवडी बाजार भरविण्यात येणार नाहीत.

मतदानाच्या दिवशी भरणार नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजार
छत्रपती संभाजीनगर : आठवडी बाजारांवर अनेक गावांचे अर्थकारण अवलंबून असते. अख्खे गावच नव्हे, तर पंचक्रोशीतील सर्व गावकरी आठवडी बाजारात खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र, सोमवारी १३ मेला लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने त्या दिवशी जिल्ह्यातील १० आठवडी बाजार भरविण्यात येणार नाहीत.
जिल्ह्यात किती आठवडी बाजार आहेत?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९२ आठवडी बाजार भरत असतात. प्रत्येक आठवडी बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
कोणत्या तालुक्यात किती आठवडी बाजार?
तालुका व आठवडी बाजारांची संख्या
शहर व तालुका : १२,
गंगापूर- ८,
कन्नड -१५,
पैठण -१३,
सिल्लोड -१३,
फुलंब्री- ९,
वैजापूर -११,
सोयगाव- ५
खुलताबाद- ६
कोणत्या वारी किती आठवडी बाजार ?
वार व आठवडी बाजार संख्या
रविवार - १७
सोमवार- १०
मंगळवार - १२
बुधवार- १४
गुरुवार- १६
शुक्रवार- ११
शनिवार- १२
सोमवारी भरणारे बाजार:
करमाड, वाळूज (छत्रपती संभाजीनगर) कन्नड, देवगाव रंगारी (कन्नड), रहाटगाव (पैठण), पानवडोद, बोरगाव बाजार, अंधारी (सिल्लोड), वडोद बाजार (फुलंब्री), वैजापूर (वैजापूर)