मी खैरेंचा नव्हे, पक्षाचा प्रचार करणार : अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 06:36 IST2024-03-28T06:35:57+5:302024-03-28T06:36:22+5:30
सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात खैरे उतरणार असून २०१४ पासून लोकसभा निवडणूक लढण्याची अपेक्षा ठेवून असलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना यावेळी देखील उमेदवारीने हुलकावणी दिली.

मी खैरेंचा नव्हे, पक्षाचा प्रचार करणार : अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना बुधवारी उमेदवारी जाहीर केली. सहाव्यांदा लोकसभेच्या मैदानात खैरे उतरणार असून २०१४ पासून लोकसभा निवडणूक लढण्याची अपेक्षा ठेवून असलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना यावेळी देखील उमेदवारीने हुलकावणी दिली.
याबाबत दानवे म्हणाले की, पक्षाने खैरे यांना उमेदवारी दिली असली तरी मी खैरेंचा अथवा कोणा व्यक्तीचा नव्हे, तर शिवसेनेचा प्रचार करणार आहे. मी निष्ठावान शिवसैनिक आहे. मीदेखील उमेदवारी मागितली होती. पण, पक्षाने खैरेंना संधी दिली. पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून मी शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे काम करणार.