छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 19:44 IST2025-12-28T19:41:01+5:302025-12-28T19:44:21+5:30
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने १८ उमेदवारांची पहिली यादी यादीर केली आहे.

छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने (अजित पवार ) १८ उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि.२८) जाहीर केली. पुढील दोन दिवसांत आणखी दोन याद्या जाहीर होतील, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी दिली.
सत्तेत एकत्र व महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार) महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेना व भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात काही माजी नगसेवकांचा समावेश आहे. देशमुख म्हणाले की, पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली. आता सोमवारी दुसरी यादी आणि तिसरी यादी मंगळवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
पहिल्या यादीत ६ महिला
राष्ट्र्रवादीच्या(अजित पवार) १८ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ६ महिलांचा समावेश आहे. त्यातील दोन माजी नगरसेविका आहेत.