छत्रपती संभाजीनगर मनपातील नवनिर्वाचित १८ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:50 IST2026-02-04T11:50:21+5:302026-02-04T11:50:40+5:30

तक्रारींचे स्वरूप: अपत्ये-३, अतिक्रमण / अनधिकृत- ११, आचारसंहिता भंग - खोटी कागदपत्रे-२, अन्य तक्रारी-२

Big news! The sword of disqualification hangs over the newly elected 18 corporators of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation! | छत्रपती संभाजीनगर मनपातील नवनिर्वाचित १८ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार!

छत्रपती संभाजीनगर मनपातील नवनिर्वाचित १८ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार!

छत्रपती संभाजीनगर: नवनिर्वाचित नगरसेवक अजूनही हारतुरे, सत्कार स्वीकारण्यातच मग्न असतानाच तब्बल १८ जणांविरुद्ध विरोधकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी एमआयएम नगरसेवकांच्या विरोधात आहेत. प्रशासन या तक्रारींची शहानिशा करीत आहे. तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे.

निवडून आलेल्या नगरसेवकांची 'कुंडली' गोळा करण्यास विरोधकांनी दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात केली. ही माहिती गोळा करणाऱ्या एकाला बेदम मारहाण केल्याची घटनाही बीड बायपासवर घडली. राजकीय पक्ष एखाद्याला उमेदवारी देण्यापूर्वीच जात प्रमाणपत्र, तीन अपत्ये, अतिक्रमण इ. मुद्यांवर चौकशी करतात. एका राजकीय पक्षाने यासंदर्भात सखोल चौकशीच केली नाही. त्याचे परिणाम आता दिसत आहेत.

महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे १८ नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाणार आहे. चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल. त्यानंतर आयुक्त यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असेही या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. कलम १० व १२ अंतर्गत संबंधित नगरसेवक उल्लंघन करीत असल्याचे स्पष्ट झाले तर अपात्रतेची कारवाई होईल. प्राप्त तक्रारींमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्ये, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, शपथपत्रात संपती लपविली, खोटी माहिती दिली अशा तक्रारी आहेत.
- जी. श्रीकांत, मनपा आयुक्त

Web Title : 18 नव निर्वाचित पार्षदों पर अयोग्यता की तलवार!

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में 18 नए निर्वाचित पार्षदों पर अयोग्यता की शिकायतें। आरोपों में दो से अधिक बच्चे, अनधिकृत निर्माण और संपत्ति छिपाना शामिल हैं। जांच चल रही है; उल्लंघन की पुष्टि होने पर अयोग्यता संभव है।

Web Title : Sword of Disqualification Hangs Over 18 Newly Elected Corporators!

Web Summary : Eighteen newly elected corporators in Chhatrapati Sambhajinagar face disqualification complaints. Allegations include having more than two children, unauthorized construction, and hiding assets. An investigation is underway; disqualification possible if violations are confirmed.