Aurangabad Lok Sabha Result 2024: औरंगाबादच्या तिहेरी लढतीत इम्तियाज जलील आघाडीवर, पहिल्या फेरीचे आकडे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:53 AM2024-06-04T09:53:19+5:302024-06-04T09:59:22+5:30

Aurangabad Lok Sabha Result 2024 : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Aurangabad Lok Sabha Result 2024 Chandrakant Khaire vs. Sandeepan Bhumare vs Imtiyaz Jalil Live result  | Aurangabad Lok Sabha Result 2024: औरंगाबादच्या तिहेरी लढतीत इम्तियाज जलील आघाडीवर, पहिल्या फेरीचे आकडे जाहीर

Aurangabad Lok Sabha Result 2024: औरंगाबादच्या तिहेरी लढतीत इम्तियाज जलील आघाडीवर, पहिल्या फेरीचे आकडे जाहीर

Aurangabad Lok Sabha Result 2024: संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळत आहेत. येथे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire), महायुतीचे संदीपान भुमरे ( Sandeepan Bhumare) आणि विद्यमान खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील ( Imtiyaj Jalili) यांच्यात तिहेरी सामना आहे. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, वैजापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावले आहेत. ७ टेबलची एक रांग अशा दोन रांगावर मतमोजणी सुरू आहे.

सध्याच्या आकडेवारी नुसार, एमआयएमचे इम्तियाज जलील हे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर आहेत. चंद्रकांत खैरे ११ हजार ४३४, संदिपान भुमरे १६ हजार ४०५ तर इम्तियाज जलील १९ हजार ७४५ अशी मते आहेत.

Web Title: Aurangabad Lok Sabha Result 2024 Chandrakant Khaire vs. Sandeepan Bhumare vs Imtiyaz Jalil Live result 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.